शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मलवाहिकांसाठी  ४१६ कोटींचा डीपीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:20 IST

शहरात नववसाहतीत मलवाहिकांचे जाळे वाढविण्यासाठी आणि चार मलनिस्सारण केंद्रांचे नूतनीकरण करण्यासाठी ४१६ कोटी रुपयांचा विस्तृत प्रकल्प अहवाल महापालिकेने तयार केला असून, तो राज्य शासनाला सादर केला आहे. तांत्रिक छाननीनंतर केंद्र सरकारच्या नदी संवर्धन योजनेत या कामांचा समावेश व्हावा यासाठी तो पाठविला जाणार आहे.

नाशिक : शहरात नववसाहतीत मलवाहिकांचे जाळे वाढविण्यासाठी आणि चार मलनिस्सारण केंद्रांचे नूतनीकरण करण्यासाठी ४१६ कोटी रुपयांचा विस्तृत प्रकल्प अहवाल महापालिकेने तयार केला असून, तो राज्य शासनाला सादर केला आहे. तांत्रिक छाननीनंतर केंद्र सरकारच्या नदी संवर्धन योजनेत या कामांचा समावेश व्हावा यासाठी तो पाठविला जाणार आहे.  शहरातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाणीपुरवठा आणि मलवाहिकांचे जाळे सुधारण्यावर भर दिला आहे. शहरात नववसाहतीत मलवाहिकांचे नेटवर्क टाकणे आणि अन्य कामांसाठी महापालिकेने यापूर्वी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करून तो शासनाला पाठविला होता. केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत हा निधी पाठविण्यात आला असला तरी नाशिक शहरासाठी मंजूर असलेला सर्व निधी वितरित झाला असल्याने शासनाने निधी देण्यास नकार दिला होता.  दरम्यान, ५ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक महापालिकेच्या विकासकामांच्या आढाव्यादरम्यान या कामांसाठी केंद्र शासनाच्या राष्टय निधी संवर्धन योजनेअंतर्गत निधी देता येईल असे सांगतानाच महापालिकेला विस्तृत प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने आराखडा तयार करून तो राज्य शासनाकडे सादर केला आहे. राज्य शासनाचा पर्यावरण विभाग त्याची तपासणी करून तो महिना अखेरीस केंद्र शासनाकडे पाठविणार आहे.  या योजनेअंतर्गत शहरात २१० किलोमीटर लांबीच्या मलवाहिका टाकण्यात येणार आहे. तसेच तपोवन, आगरटाकळी, दसक-पंचक आणि चेहेडी अशा चार मलनिस्सारण केंद्रांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे गोदापात्रातील प्रदूषण कमी होण्यासदेखील मदत होणार आहे.महापालिकेला आर्थिक दिलासा शक्ययापूर्वी अमृत योजनेअंतर्गत महापालिकेला निधी न मिळाल्याने महापालिकेने स्वनिधीतून मलवाहिकांची कामे करण्याचे ठरविले होते. त्यासाठी ११० कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा मागविल्या होत्या. यावर्षी मलवाहिकांसाठी ५० कोटी तर पुढील वर्षी ५० कोटी अशी कामे करण्यात येणार होती; मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याने महापालिकेला मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो.आता दहा बीओडीमनपाच्या वतीने चार मलनिस्सारण केंद्रातील कालबाह्य तंत्रज्ञान बाजूला सारून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे सध्या ३० बीओडी इतके प्रक्रियायुक्त मलजल नदीपात्रात सोडले जाते ते आता १० बीओडी इतक्या मर्यादेत करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील नदीपात्रात होणारे प्रदूषण टाळण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका