शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
2
“काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत परिवर्तन घडवा”: एकनाथ शिंदे
3
SBI एटीएम व्यवहारांच्या शुल्कात वाढ; सॅलरी अकाउंटसाठी 'अनलिमिटेड' फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा बंद
4
पूजा खेडेकरला बांधून ठेवलं, आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं, अन…, नोकरानेच केली घरात चोरी
5
IND vs NZ 1st ODI Live Streaming : रोहित-विराट पुन्हा मैदानात उतरणार; कोण ठरणार सगळ्यात भारी?
6
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! दगडू सकपाळ यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश
7
श्रेयस अय्यर विमानतळावर असताना विचित्र प्रकार! कुत्र्याने जबडा उघडला, तितक्यात... (VIDEO)
8
चांदीचा धमाका! एका आठवड्यात १५ हजार रुपयांची वाढ; सोने विक्रमी पातळीच्या दिशेने, ताजे दर काय?
9
US Air Strike In Syria : आता सीरियात अमेरिकेचा मोठा हल्ला, 35 ठिकानांवर बॉम्बिंग; 90 हून अधिक 'प्रिसीजन म्यूनिशन'चा वापर
10
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन कुठे पाहाल? कोणते स्पर्धक असणार? जाणून घ्या एका क्लिकवर
11
“पुतिन यांचा १० वर्षे प्रयत्न पण अपयश, मी ८ युद्धे थांबवली, प्रत्येकासाठी नोबेल हवे”: ट्रम्प
12
"नाकातून रक्त, रक्ताच्या उलट्या अन्..."; व्हेनेझुएलात अमेरिकेनं वापरलं 'मिस्ट्री वेपन'! मादुरो यांच्या सैनिकानंच सांगितला संपूर्ण थरार
13
मुंबई पोलिसांना कडक सॅल्यूट! हरवलेले ३३,५१४ मोबाइल परत केले; युपीतच १६५० सापडले, २ कोटी...
14
Malegaon Municipal Election 2026 : मालेगावी उमेदवारांचा प्रचार मंत्री, आजी-माजी आमदारांच्या खांद्यावर
15
Nashik Municipal Election 2026 : "नाशिक ही आई; शहराचा मेकओव्हर करू, ५४० चौ. फूट घरांना घरपट्टी माफ"; एकनाथ शिंदेंचा अजेंडा
16
भारतीय 'सबीह खान' यांची Apple मध्ये जादू! २३४ कोटींचे वार्षिक पॅकेज; कुठे झालंय शिक्षण?
17
Nashik Municipal Election 2026 : २०१२ मध्ये ब्ल्यू प्रिंट; २०१७ मध्ये दत्तक, यंदा काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणांकडे लक्ष
18
भारताला जागतिक धक्का! १० शक्तिशाली देशांच्या यादीतून नाव गायब; रँकिंगमध्ये देश कितव्या स्थानी?
19
Nashik Municipal Election 2026 : अखेरच्या टप्प्यात प्रत्येक प्रभागासाठी भाजपकडून आता स्वतंत्र सूक्ष्म नियोजन
20
कारचा चक्काचूर, कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांना अपघात; दोघे जागीच दगावले
Daily Top 2Weekly Top 5

घरबसल्या डाऊनलोड केले २१ लाख सातबारा उतारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:15 IST

नाशिक: जमिनीसंदर्भातील व्यवहरासाठी लागणारे डिजिटलाईजड‌् स्वाक्षरीचे सातबारा उतारे ई-गर्व्हनन्सच्याच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याने नाशिक जिल्ह्यात २१ लाख २२ हजार १५५ ...

नाशिक: जमिनीसंदर्भातील व्यवहरासाठी लागणारे डिजिटलाईजड‌् स्वाक्षरीचे सातबारा उतारे ई-गर्व्हनन्सच्याच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याने नाशिक जिल्ह्यात २१ लाख २२ हजार १५५ सातबारा उतारे नागरिकांनी डाऊनलोड करून मिळविले आहेत. या सुविधेमुळे शासकीय यंत्रणेवरील ताण आणि नागरिकांचा वेळ देखील वाचला आहे.

सातबारा उतऱ्यातील त्रुटी दूर करून नागरिकांना जमिनीचे डिजिटल स्वाक्षरीचे उतारे उपलब्ध करून देण्याची मेाहिम राज्यशासनाने राबविली आहे. त्यानुसार जिल्ह्यात उताऱ्याचे संगणकीकरण करण्यात आले असून त्रुटींची देखील दुरूस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना जूने अभिलेख आता संगणकीकृत उपलब्ध असल्याने जमिनीची माहिती मिळविणे सोपे झाले आहे. ई-गर्व्हनन्सच्याच्या माध्यमातून जमिनीचे सातबारा उतारे, आठ-अ तसेच फेरफार नोंदीची माहिती घरबसल्या उपलब्ध होत आहे. जिल्ह्यात २१ लाख २२ हजार १५५ सातबारा उतारे नागरिकांनी डाऊनलोड करून घेतले आहेत. त्याचप्रमाणे ९ लाख तीन हजार ६०४ आठ अ चे उतारे तर ३ लाख ९ हजार ५०७ फेरफार नोंदीचे उतारे नागरिकांना डाऊनलोड करून मिळविले आहेत. जिल्ह्यात या प्रकारे एकुण ३३ लाख ३५ हजार २६६ इतके उतारे नागरिकांनी घरबसल्या मिळविले आहेत. या संख्येवरून जिल्ह्यात ऑनलाईनच्या माध्यमातून उतारे मिळविण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे यावरून दिसत आहे.

जमिनीसंदर्भातील माहिती खासगी तसेच शासकीय कामासाठी अनेकदा महत्वाची ठरत असते. जमिनीच्या मुळ मालकापासून तर त्यात वेळोवेळी होत गेेेलेल्या बदलांंच्या नेांदी ऑनलाईन सहज उपलब्ध होत असून त्यासाठी आता तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत नाहीत. जमिनीचे सातबार, फेरफार,खाते उतारे यांची माहिती भूमी अभिलेख आणि तहसील कार्यालयात उपलब्ध‌् होती ती आता ऑनलाईन उपलब्ध झाल्याने यंत्रणेवरील ताण देखील कमी झाला आहे.

जिल्ह्यात लाखो उतारे ऑनलाईन वितरीत झाले आहेत. संबंधितांनी ऑनलाईच्या माध्यमातून उतारे प्राप्त करवून घेत आहेत.

जमिन खरेदी,विक्रीच्या व्यवहारासाठी उतारे महत्वाचे असल्याने दररोज हजारेा लोक ऑनलाईन माध्यमाला भेट देत असतात तर प्रत्यक्षात उतारे काढणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.

--इन्फो--

२३११ उताऱ्यांची लवकरच दुरूस्ती

जिल्ह्यात सातबारा उताऱ्यातील दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्यानंतर १२,५०,९४८ इतके उताऱ्यांची दुरूस्ती करण्यात आलेली आहे. आता केवळ २३११ इतकेच उतारे दुरूस्त करणे राहिले असून त्यातील त्रुटी दूर झाल्यानंतर संपुर्ण डिजिटलायझेन होण्याचा मान जिल्ह्याला मिळणार आहे. उताऱ्यांमधील दुरूस्तीमुळे मालमत्ताधारकांची होणारी गैरसोय दूर झाली आहे.

--इन्फेा--

नागरिकांसाठी दस्तऐवज वितरण

तालुका सातबारा आठ अ फेरफार एकुण

नाशिक २८६७८६ ३१२८५ ९६७२७ ४१४७९८

सुरगाणा ४६२१२ ३७८८२ १३७८ ८५४७२

त्र्यंबक ५१०३१ १४८६४ ६८७४ ७२७६९

इगतपुरी ३७२५७ ७२९३ १६६६२ ६१२१२

सिन्नर २३५१०८ १०२६१९ ३०१५३ ३६७८८०

निफाड २१३९८७ ८३०७५ ३१४४८ ३२८५१०

येवला ९३३३० ९३०५६ १०६६९ १५७०५५

कळवण ५६२६६ ३१७४१ ९३५१ ९७३५८

देवळा ११९६६७ ४२५१४ ६०८५ १६८२६६

बागलाण १८१०२४ ९३०८४ १२३९८ २८६५०६

मालेगाव ३२३२०० १५८२७८ ३१११२ ५१२५९०

नांदगाव ५३९३६ ३१९७२ १२५५१ ९८४५९

चांदवड १७१०८८ ७४५२६ १८२३८ २६३८५२

दिंडोरी २०००६९ ९६५३६ २३८९५ ३२०५००

पेठ ५३१९४ ४४८७९ १९६६ १०००३९

एकुण २१२२१५५ ९०३६०४ ३०९५०७ ३३३५२६६