शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गावठी दारु विक्र ेत्यांवर धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 18:13 IST

कळवण पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने अवैधरित्या दारु विक्र ी व गावठी दारूचे अड्डे चालवणाऱ्यांविरोधात कळवण पोलिसांनी ‘आॅपरेशन वॉश आउट’ सुरू केले.

ठळक मुद्देधाबे दणाणले : कळवण पोलीसांची धडक मोहीम

कळवण : पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने अवैधरित्या दारु विक्र ी व गावठी दारूचे अड्डे चालवणाऱ्यांविरोधात कळवण पोलिसांनी ‘आॅपरेशन वॉश आउट’ सुरू केले.या कारवाईचा भाग म्हणून पोलिस स्टेशन हद्दीतील नवीबेज, भेंडी, बिजोरे, विसापूर, गांगवण, बगडू, चाचेर, भादवण परिसरात गावठी दारु पुरवठा करणारा पिळकोस व गणोरे आदीवासी परिसरात गावठी दारु पुरवठा करणारा गणोरे( कुत्तरबारी) येथील गावठी दारु बनवणारा अड्डाच पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून धडक मोहीमेत पिळकोस येथे १८00 लिटर तर गणोरे येथे ६00 लिटर असे २४00 लिटर रसायन व १0 लिटर दारु नष्ट करण्यात आली आहे. गावठी दारु पुरवठा करणारे व बनविणारे यांच्या विरोधात धडक मोहीम सुरु करु न पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याने अवैध दारु विक्र ी व गावठी दारु विक्र ेत्यांचे धाबे दणाणले आहेत.पिळकोस शिवारातील गिरणा नदी किनारी परिसरात काटेरी बाभुळांच्या घनदाट झुडपात गावठी दारु तयार केली जात असल्याची माहीती कळवण पोलीसांना मिळाल्यानंतर बुधवारी सकाळी काटेरी बांभुळाचा परिसर कळवणचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद जाधोर ,पोलीस हवालदार मधुकर तारु ,किरण परदेशी,विश्वनाथ झरिवाळ, संदीप कडाळे, गोकुळ खैरनार, संदीप बागुल, कैलास घरटे, जगन पवार, दौलत कोशारे यांनी गावठी दारु भट्टीचा शोध घेऊन घनदाट झुडपातील १८00 लीटर रसायन व हातभट्टीचे साहीत्य नेस्तनाबूत केले. २५ ते ३० हजार किमतीचे रसायन व साहीत्य उध्वस्त करु न गावठी दारूचे काटेरी झुडपातील समुळ नष्ट केल्याने अनेक दिवसांपासून चोरी चुपके सुरु असलेल्या गावठी विक्र ीचे अड्डे उध्वस्त झाल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.दरम्यान पोलीसांचा सुगावा लागताच उत्तम छबू बोरसे, विश्वास दादाजी माळी, कौतिक नारायण सोनवणे (सर्व पिळकोस) हे पळून गेले 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीliquor banदारूबंदी