शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
2
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; थोड्याच वेळात पत्रकार परिषद
4
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
5
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
6
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
7
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
9
"जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
10
"अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
11
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
12
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
13
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
14
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
15
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
16
Mumbai Rains: ढगांच्या गडगडाटासह कांदिवली, बोरिवली भागात मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ
17
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
18
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
19
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
20
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा

डोंगरगाव येथे शॉर्टसर्किटने डाळिंबबाग खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:34 IST

देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत रमेश दामू सावंत या शेतकऱ्याची डाळिंबबाग होरपळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील वर्षी याच कारणाने त्यांचा सुमारे पंचवीस टन डाळिंब जळून लाखोंचे नुकसान झाले होते. यावर्षीसुद्धा शार्टसर्किट होऊन बाग जळाल्याने सावंत विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे पुरते हतबल झाले आहेत.

उमराणे : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत रमेश दामू सावंत या शेतकऱ्याची डाळिंबबाग होरपळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील वर्षी याच कारणाने त्यांचा सुमारे पंचवीस टन डाळिंब जळून लाखोंचे नुकसान झाले होते. यावर्षीसुद्धा शार्टसर्किट होऊन बाग जळाल्याने सावंत विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे पुरते हतबल झाले आहेत.खारीपाडा शिवारात डोंगरगाव येथील शेतकरी सावंत यांनी साडेतीन हजार डाळिंब आणि एक हजार आवळा झाडांची बाग फुलविली आहे. शेतालगत असलेल्या वन्या ओहळच्या आजूबाजूला काटेरी झुडपे वाढली आहेत. झुडपांवरून वीजवाहिन्या गेल्या आहेत. या वाहिन्या लोंबकळलेल्या स्थितीत असल्याने वारा व पक्ष्यांच्या हालचालीने शॉर्टसर्किट होते. यात सावंत यांच्या डाळिंबाच्या बागेतील सुमारे साठ ते सत्तर झाडे आगीने होरपळली आहेत. शेजारील शेतकरी बांधवांनी प्रसंगावधान राखत आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. डोंगरगाव भागातील विद्युतवाहिन्या लोंबकळताना दिसतात. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकºयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. मागील वर्षी सुमारे छत्तीस लाखांचे नुकसान झाले होते; परंतु वीज वितरण कंपनीने केलेल्या चुकीच्या पंचनाम्यामुळे या शेतकºयाला अद्यापही दमडीची भरपाईसुद्धा मिळालेली नाही.

टॅग्स :fireआग