इगतपुरी : ज्याठिकाणी जायला नीटसा रस्ता नाही, भारनियमनामुळे वीजपुरवठा नसतो, अशा अतिदुर्गम भागात असलेल्या धामडकी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला मुंबईतील पेहेचान प्रगती फाऊण्डेशनने मदतीचा हात दिला आणि मैत्रदिनी इन्व्हर्टरची भेट देत शाळा वीज भारनियमनमुक्त केली.मुंबईतील पेहेचान प्रगती फाऊंडेशनच्या सदस्य नूतन जैन आणि त्यांच्या टीम कडून इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात, ज्या गावात शाळेत जायला रस्ता नाही अशा जिल्हा परिषदेच्या धामडकी शाळेला १८ हजार रूपये किमतीचे इन्व्हर्टर, सर्व मुलांना दप्तर, कॅरम बोर्ड, घड्याळ, पोषण आहारासाठी प्लेट्स, गावकऱ्यांना कपडे आदींचे वाटप केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले. यावेळी, पेहेचान फाउण्डेशनच्या नूतन जैन व टीमच्या सदस्य देवी पै, अनिता जैन, सरिता जीलान, सुनीता कंडोली, मधु मल्होत्रा, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोकुळ आगिवले आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच शाळेत विना मोबदला इन्व्हर्टर फिटिंग करण्यासाठी सहकार्य करणारे मतिन उबाळे यांचा सत्कार करण्यात आला.फाउण्डेशनकडून गौरवमाझी धामडकी येथे बदली झाली. आधी मी भगतवाडी या शाळेत होतो. सदर शाळाही लोडशेडिंगमुक्त करणा-या आणि सुविधा पुरविणा-या पेहेचान फाऊण्डेशनला बदली झालेल्या गावातील शाळेलाही मदत देण्याची विनंती केली. नूतन जैन व त्यांच्या टीमने त्यास तत्काळ प्रतिसाद दिला व मदतीचा हात दिला. मैत्र दिनाचा मुहूर्त साधत टीमने अनोखी भेट देऊन आमचा गौरव केला आहे.प्रमोद परदेशी, मुख्याध्यापकगावक-यांच्या चेह-यावर आनंदशाळेपर्यंत जायला रस्ता नाही. १ किमी पर्यंत पायी चालत जावे लागते. शाळेत इन्व्हर्टर बसविण्यासाठी गावक-यांना आम्ही शब्द दिला. त्यानुसार साहित्य घेऊन आलो त्या दिवशी ९० किलो वजन असलेला इन्व्हर्टर शाळेपर्यंत पोहचिवण्यासाठी गावक-यांना मोठी कसरत करावी लागली. मुलांना एवढी मदत मिळाल्यावर गावक-यांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता.- नूतन जैन, अध्यक्ष, पेहेचान फाउंडेशन
धामडकी शाळा झाली वीज भारनियमनमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 17:58 IST
मैत्री दिनाची भेट : पेहेचान फाउण्डेशनचा मदतीचा हात
धामडकी शाळा झाली वीज भारनियमनमुक्त
ठळक मुद्देधामडकी शाळेला १८ हजार रूपये किमतीचे इन्व्हर्टर, सर्व मुलांना दप्तर, कॅरम बोर्ड, घड्याळ, पोषण आहारासाठी प्लेट्स, गावकऱ्यांना कपडे आदींचे वाटप शाळेत विना मोबदला इन्व्हर्टर फिटिंग करण्यासाठी सहकार्य करणारे मतिन उबाळे यांचा सत्कार