शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

..अखेर उघडले मिळकतींचे दार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 01:16 IST

महापालिकेच्या मिळकती सील केल्यानंतर निर्माण झालेल्या वाद-विवादानंतर आता प्रशासनाने व्यावसायिक वापर नसलेल्या मिळकतींचे काही सील काढले. त्याचबरोबर ज्या संस्थांनी प्रशासनाच्या मागणीनुसार महिना-दोन महिन्यांचे भाडे आगाऊ भरले, त्यांच्या वाचनालय तसेच अभ्यासिका, व्यायामशाळांचे सील उघडण्यास प्रारंभ केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देसील प्रकरण : अनेक संस्थांना दिलासा

नाशिक : महापालिकेच्या मिळकती सील केल्यानंतर निर्माण झालेल्या वाद-विवादानंतर आता प्रशासनाने व्यावसायिक वापर नसलेल्या मिळकतींचे काही सील काढले. त्याचबरोबर ज्या संस्थांनी प्रशासनाच्या मागणीनुसार महिना-दोन महिन्यांचे भाडे आगाऊ भरले, त्यांच्या वाचनालय तसेच अभ्यासिका, व्यायामशाळांचे सील उघडण्यास प्रारंभ केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तथापि, किती मिळकतींना दिलासा देण्यात आला हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.उच्च न्यायालयात दाखल एका जनहित याचिकेचा आधार घेऊन महापालिकेने आपल्या भाड्याने दिलेल्या मिळकतींवर सील केले आहे. सुमारे तीनशे मिळकती महापालिकेने सील केल्या असून, त्यात समाजमंदिर, व्यायामशाळा, जीम, अभ्यासिका त्याचबरोबर व्यावसायिक वापर नसलेल्या मिळकतीदेखील सील करण्यात आल्या असून, त्यामुळे असंतोष निर्र्माण झाला होता. मंदिरेदेखील प्रशासनाने सोडली नव्हती. नगरसेवकांबरोबर सत्तारूढ भाजपाचे पदाधिकारीदेखील या विषयावरून आक्रमक झाले. मुळात मिळकती सील करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश नसतानाही महापालिकेने असे पाऊल उचलल्याने रोष वाढला होता. गेल्या शुक्रवारी (दि. १०) आयुक्तांनी ज्येष्ठ नागरिकांची विरंगुळा केंद्रे, हास्य क्लब, योग सभागृह तसेच अन्य वास्तुंना सील केले असले तरी ते तत्काळ उघडण्यात येईल, असे सांगितले होते.संबंधित संस्थांकडून अर्ज करून घेतल्यानंतर त्यांची तपासणी करून तसेच परिसरातील नागरिकांकडून या मिळकतींचा व्यावसायिक वापर होतो किंवा नाही ते तपासून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्याचा आधार घेऊन अधिकाऱ्यांनी तपासणी केली व ज्यामिळकतींचा व्यावसायिक वापर होत नाही त्या खुल्या करण्यास प्रारंभ केला.ज्या मिळकतीत अभ्यासिका किंवा वाचनालयाच्या सशुल्क सेवा आहेत त्यांच्या बाबतीत मात्र आगामी दोन महिन्यांचे भाडे रेडीरेकनरच्या अडीच टक्के दराने घेऊन त्या खुल्या करून दिल्या जात आहेत. पुढील महिन्यात महापालिकेच्या महासभेत रेडीरेकनरचे दर घटवण्याचा ठराव केल्यानंतर संंबंधित संस्थांनी भरलेली मिळकत समायोजित केली जाणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाbusinessव्यवसाय