शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मागच्या दाराने आले अन् बंगल्यातील दागिण्यांची तिजोरी रिकामी करुन गेले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 16:34 IST

सावरकरनगर येथे राहणारे प्रतिक सुशिल चक्रनारायण यांच्या ३६ क्रमांकाच्या भुखंडावरील शिल्प बंगला कुलूपबंद होता.

ठळक मुद्देआठ लाख दहा हजाराचे दागिणे लंपास केल्याची घटना गुन्हेगारांची दहशत; संध्याकाळी घरफोडी

नाशिक : शहर व परिसरात घरफोडी, दुचाकीचोरी, हाणामाऱ्यांसारख्या गुन्हेगारीच्या घटना सातत्याने सुरूच असून गंगापूररोडवरील सावरकरनगरसारख्या उच्चभ्रू वसाहतीमधील ‘शिल्प’ बंगल्यात किचना दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरामधील सुमारे आठ लाख दहा हजाराचे दागिणे लंपास केल्याची घटना घडली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सावरकरनगर येथे राहणारे प्रतिक सुशिल चक्रनारायण यांच्या ३६ क्रमांकाच्या भुखंडावरील शिल्प बंगला कुलूपबंद होता. त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने बंगल्यात पाठीमागील बाजूने किचनचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. बंगल्यातील लाकडी कपाट तोडून त्यामधील लहान तिजोरी फोडून दागिने भामट्याने लंपास केल्याचे चक्रनारायण यांनी फिर्यादीत म्हटले आहे. चोरट्याने वीस तोळे सोन्याची सुमारे तीन लाखाची सोन्याची अंगठी, ४५ हजाराच्या सोन्याच्या प्रत्येकी ४०ग्रॅमच्या नऊ बांगड्या, ४० हजाराचे कानातील खडे असलेल्या दोन रिंग, ३० हजाराच्या गळ्यातील सोन्याच पॅँडल, १० हजाराच्या कानातील पाच ग्रॅमच्या रिंग, एक लाखाचे गळ्यातील अ‍ॅमरॉल्ड पॅँडल, ३०हजाराचे गळ्यातील हिरेजडीत पॅँडल, एक लाखाच्या दोन सोन्याच्या बांगड्या,४५ हजाराचे तीन तोळ्याचा हार, ६० हजाराचा चार तोळ्यांच्या बांगड्या, ५०हजाराची रोख रक्कम असा ऐवज चोरट्याने लंपास केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे.याप्रकरणी गंगापूर पालीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरिक्षक वाघ करीत आहेत.गुन्हेगारांची दहशत; संध्याकाळी घरफोडीसावरकरनगर, गंगापूररोड परिसर, नृसिंहनगर, आकाशवाणी टॉवर या भागात या जबरी घरफोडीमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घर बंद करुन जाणेदेखील धोक्याचे ठरु लागल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. गंगापूर पोलीस ठाण्याकडून या भागात पोलीस गस्त थंडावली असून मोकाट गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याची मागणी होऊ लागली आहे. कारण चोरट्यांची मजल इतकी वाढली आहे की त्यांनी शारदाननगर येथील शिल्प बंगल्यातील तिजोरी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास लुटून नेली. त्यामुळे रात्रीच्या वेळी या भागातील बंद राहणा-या घरांची सुरक्षितता अधिकच धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.अद्याप एकाही संशयिताला ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आलेले नाही.

टॅग्स :RobberyदरोडाCrime Newsगुन्हेगारीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय