बांधकाम व्यवसायातील आपत्तींना घाबरू नका: ओढेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:52 AM2019-08-10T00:52:16+5:302019-08-10T00:52:51+5:30

बांधकाम व्यवसाय हे क्षेत्र जोखमीचे असले तरी यामध्ये आपल्या जबाबदाऱ्या ओळखून काम केले, तर कुठलीही आपत्ती ओढावणार नाही तसेच बांधकामावेळी चुकून एखादा अपघात झाला तर घाबरून जाता कामा नये. यासाठी कायदेशीर सल्ले घेऊन आपण यातून बाहेर पडू शकतो. असे प्रतिपादन कायदेतज्ज्ञ व बांधकामतज्ज्ञ दिलीप ओढेकर यांनी केले.

Don't be afraid of disaster in construction | बांधकाम व्यवसायातील आपत्तींना घाबरू नका: ओढेकर

बांधकाम व्यवसायातील आपत्तींना घाबरू नका: ओढेकर

Next
ठळक मुद्देकायदेशीर सल्ला घेण्याचे आवाहन

नाशिक : बांधकाम व्यवसाय हे क्षेत्र जोखमीचे असले तरी यामध्ये आपल्या जबाबदाऱ्या ओळखून काम केले, तर कुठलीही आपत्ती ओढावणार नाही तसेच बांधकामावेळी चुकून एखादा अपघात झाला तर घाबरून जाता कामा नये. यासाठी कायदेशीर सल्ले घेऊन आपण यातून बाहेर पडू शकतो. असे प्रतिपादन कायदेतज्ज्ञ व बांधकामतज्ज्ञ दिलीप ओढेकर यांनी केले. आर्किटेकव इंजिनियर असोसिएशनतर्फे शुक्रवारी (दि.०९) शरणपूर रोडवरील वैराज सभागृह येथे आयोजित ‘बांधकाम व्यवसायात होणारे अपघात व कायदेशीर सल्ले’ या कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. बांधकाम व्यवसाय हा जोखमीचा आहे, पण आपण आपल्या जबाबदाऱ्यांचे भान ठेवून काम केले तर यात आपण उत्तमप्रकारे काम करू शकतो. एखादा अपघात झाला तर लोक बिल्डर्स व आर्किटेक यांना जबाबदार धरतात. यावेळी मुख्य काम करणारे इंजिनियर व कामगार यातून बाहेर पडतात. त्यामुळे अशा वेळी आपण बांधकामावेळी जातीने लक्ष घातले पाहिजे. तसेच कधी अ‍ॅक्ट आॅफ गॉडमध्ये एखादा अपघात झाल्यास काय करायला हवे, तुम्ही जे व्यक्ती कामावर घेतले आहे त्यांची पात्रता चांगली असायला हवी, त्याचप्रमाणे कंत्राटी पद्धतीने दिलेल्या कामात जातीने लक्ष दिले गेले पाहिजे. आपल्या बांधकासाठी लागणाºया नियमांचे पालन करावे, बांधकाम करण्याआधी आपले कागदपत्रे कायदेशीर पद्धतीने तयार करण्यासाठी वकिलांचा सल्ला घ्यावा, असे ओढेकर यांनी सांगितले.
यावेळी शंकांचे निरसन ओढेकर यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन हर्षद भामरे यांनी केले. वेळी संस्थेचे अध्यक्ष योगेश कासार, उपाध्यक्ष चारुदत्त नेरकर, माजी अध्यक्ष दीपक देवरे, चंद्रकांत धामणे, नरेंद्र भुसे, राजेंद्र जाधव, संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Don't be afraid of disaster in construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.