शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

मजुरीच्या पैशातून शाळेला दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2015 21:35 IST

शुभवर्तमान : पेठ तालुक्यातील म्हसणविहिरा ग्रामस्थांचे कौतुक

पेठ : म्हसणविहिरा. पेठ तालुक्यातील एकेकाळचा सर्वाधिक व्यसनी म्हणून ओळखला जाणारा आदिवासी पाडा. या गावाला पेठ तालुक्याचे कुवेत संबोधले जात होते़ मात्र आज याच गावाने शिक्षणात क्रांती करून रोजच्या मजुरीतले पैसे वाचवून शाळेचा विकास केला असून, आज म्हसणविहिरा गावची शाळा ही डिजिटल शाळा ठरली आहे़म्हसणविहिरा हे गाव म्हणजे जवळपास ३५० लोकसंख्येचा पाडा. सन २००१ मध्ये या गावात वस्तीशाळा सुरू करण्यात आली़ एका खासगी घराच्या पडवीत येथील विद्यार्थी ज्ञानार्जनाचे धडे गिरवू लागले़ सन २००८ मध्ये या शाळेचे नियमित शाळेत रूपांतर झाले़ शाळेला सर्वशिक्षा अभियानामधून खोलीही मंजूर झाली. पण जागेचा प्रश्न निर्माण झाला़ शिक्षकांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन समस्या मांडली़ याच गावातील भास्कर लक्ष्मण बदादे या ग्रामस्थाने आपल्या शेतजमिनीतील दोन गुंठे जागा शाळेला दान केली़ या ठिकाणी वर्गखोली बांधण्यात आली़ ग्रामस्थांनी जवळपास पन्नास हजार रुपयांचे श्रमदान करून सपाटीकरण केले़ शाळेला वर्गणी करून पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली़पंचायत समितीचे उपसभापती महेश टोपले यांच्या हस्ते संगणक हस्तांतरण सोहळा संपन्न झाला़ यावेळी गटविकास अधिकारी बी़ बी़ बहिरम, माजी जि़ प़ सदस्य सुधाकर राऊत, गटशिक्षणाधिकारी के. बी़ माळवाळ, विस्तार अधिकारी एस़ एऩ झोले, व्ही़ एस़ खैरनार, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी पवार, सरपंच, केंद्रप्रमुख पागी, जगन्नाथ जाधव, श्रीमती आढाव, आदिवासी शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष मनोहर टोपले, तालुकाध्यक्ष राजेंद्र भोये, शिक्षक संघाचे अध्यक्ष रामदास शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कौशल्या कडाळी, माता पालक संघाच्या अध्यक्ष हेमलता कडाळी, वैशाली भुसारे, गंगाधर कडाळी, युवराज भुसारे, यशवंत वार्डे, पुंडलिक वार्डे यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते़ हनुमंत खंबाईत यांनी सूत्रसंचालन केले. अशोक पवार यांनी आभार मानले़ (वार्ताहर)