शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

औष्णिक  वीज केंद्रात श्वान पथक तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:39 IST

येथील नाशिक औष्णिक वीज केंद्र परिसर व कामगार वसाहतीच्या सुरक्षेसाठी सध्या असलेल्या सुरक्षा यंत्रणेव्यतिरिक्त सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी श्वान पथकही तैनात करण्यात आले आहे.

एकलहरे : येथील नाशिक औष्णिक वीज केंद्र परिसर व कामगार वसाहतीच्या सुरक्षेसाठी सध्या असलेल्या सुरक्षा यंत्रणेव्यतिरिक्त सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी श्वान पथकही तैनात करण्यात आले आहे.  एकलहरे वसाहतीत स्वत:ला भाई म्हणून फेमस होण्यासाठी एका युवकाने काही दिवसांपूर्वी स्वत:वर गोळीबार घडवून आणला होता. या घटनेमुळे एकलहरे वसाहतीतील नागरिकांत भीतीचे सावट निर्माण झाले तर एकलहरे औष्णिक वीज केंद्राच्या सुरक्षिततेचाही प्रश्न उपस्थित झाला होता.  या घटनेची दखल घेत मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांनी एकलहरे वसाहत व वीज केंद्र परिसराची सुरक्षा व्यवस्था कडक केली. चेमरी नंबर एकचे गेट क्रमांक एक व सिद्धार्थनगर जवळील नवीन डी टाइपचे गेट नंबर दोन येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांची, वाहनांची, एस.टी. बसेसची तपासणी करूनच त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे अनावश्यक ये-जा करणारे व आगंतुकांना आळा बसण्यास मदत झाली. परंतु एकलहरे वीज केंद्राच्या सुरक्षिततेचा विचार करता १८ आॅगस्टपासून परिसरात श्वान पथक तैनात करण्यात आले आहे.  सुरक्षा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक किशोर फडतरे यांच्या नियंत्रणाखाली श्वान पथक कार्यरत असून, त्यात प्रशिक्षित डॉबरमॅन व किंगकोब्रा जातीच्या श्वानांचा समावेश आहे. तसेच त्यांच्यासोबत प्रशिक्षित कर्मचारीही आहेत. हे श्वानपथक वीज केंद्र व रहिवासी कॉलनी व्यतिरिक्त वसाहतीबाहेरील सिद्धार्थनगर, हनुमाननगर, देशमुखवाडी, पहाडीबाबा झोपडपट्टी, एकलहरे गाव, वीज केंद्राची चहुबाजूची संरक्षक भिंत, एकलहरे बंधारा, गंगावाडी परिसर या भागात गस्त घालेल. या प्रशिक्षित श्वान पथकामुळे भुरट्या चोºया व संशयित इसमांना आळा बसेल.

टॅग्स :electricityवीजdogकुत्रा