शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

न्यायालयांना राजकारण्यांविषयी आकस आहे का, रामराजे निंबाळकर यांचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 4:25 PM

सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचे काही निकाल बघितले तर असेच वाटते अशी पुष्टीही त्यांनी जोडली. कोणत्याही कामासंदर्भात शासनाने किंवा संबंधित खात्याने केलेल्या आर्थिक तरतुदीशी निगडित कामे असतात, न्यायालयाच्या एका इमारत बांधकामापेक्षा मतदारांना केटीवेअर बांधून देणे हे आमदार आणि शासनाच्या दृष्टीने अधिक प्राधान्यक्रमाचे असते, असेही ते म्हणाले.

ठळक मुद्दे नाशिकमध्ये मान्यवरांशी साधला संवादमराठवाड्याला पिण्यापुरतेच पाणी देण्याची गरज

नाशिक : कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि विधि मंडळ आपापल्या स्तरावर सक्षम असले तरी न्यायालयाची सक्रियता वाढत आहे, जलस्रोताच्या विषयावर न्यायालय निर्णय घेते याबाबत काहीसे आश्चर्य विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे. न्यायालयची सक्रीयता वाढत आहेच, मात्र त्याच बरोबर उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयांचे काही निकाल बघता न्यायव्यवस्थेला राजकारण्यांविषयी आकस आहे काय असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, मराठवाड्याविषयी बोलताना त्यांनी केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच नाशिकमधून विसर्ग करावा, असे मतही व्यक्त केले.नाशिक दौऱ्यावर असलेल्या सभापती रामराजे निंबाळकर यांच्याशी गप्पाटप्पांचा कार्यक्रम बुधवारी (दि. ३१) कुसुमाग्रज स्मारकात झाला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना त्यांनी मनमोकळी उत्तरे दिली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे आमदार हेमंत टकले, माजी आमदार विलास लोणारी आणि मकरंद हिंगणे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायव्यवस्थेच्या चाकोरीतील सजगतेविषयी बोलताना निंबाळकर यांनी सध्या न्यायालये खूपच सक्रिय झाली असल्याचे मत नोंदविले. विशेषत: अलीकडील काळात पाण्यासारख्या विषयावर जलस्रोतांबद्दल न्यायालयच निर्णय देते असे सांगताना पर्यावरण आणि वनखात्याविषयीचे निर्णय तर न्यायालय परस्पर समित्या घोषित करून निर्णय घेत असल्याचे सांगून मंत्र्यांनादेखील त्याबाबत अधिकार नसल्याचे ते म्हणाले. मराठवाड्याला पाणी सोडावे किंवा नाही याबाबतदेखील कायदे असताना न्यायालय निर्णय देते असे सांगताना रामराजे यांनी चिंता व्यक्त केली. मराठवाड्याला पाणी द्यायला हवे; परंतु नाशिक जिल्ह्यातील पाण्याची स्थिती बघता ते केवळ पिण्यासाठीच द्यायला हवे उसाच्या शेतीसाठी नको असेही निंबाळकर यांनी मत व्यक्त केले.

न्यायालयासंदर्भातच आणखी एका प्रश्नावर बोलताना निंबाळकर यांनी न्यायालयाला राजकारणी आणि राज्यकर्त्यांविषयी आकस आहे काय असा प्रतिप्रश्न केला. अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी राजकारणी लोक किंवा सत्ताधारी न्यायालयासाठी इमारती बांधणे किंवा जागा देणे यासारखे कोणतेही विषय असले की ते बाजूला ठेवतात, त्यामुळे राजकारण्यांना न्यायालयाविषयी आकस आहे का? असा प्रश्न केला होता. त्यावर निंबाळकर यांनी टिप्पणी करतानाच हा प्रतिप्रश्न केला. सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचे काही निकाल बघितले तर असेच वाटते अशी पुष्टीही त्यांनी जोडली. कोणत्याही कामासंदर्भात शासनाने किंवा संबंधित खात्याने केलेल्या आर्थिक तरतुदीशी निगडित कामे असतात, न्यायालयाच्या एका इमारत बांधकामापेक्षा मतदारांना केटीवेअर बांधून देणे हे आमदार आणि शासनाच्या दृष्टीने अधिक प्राधान्यक्रमाचे असते, असेही ते म्हणाले.लोकसभा निवडणूक लढविण्यास तयारसाता-यात उदयन राजे भोसले यांच्या विरोधात सर्व पक्षीयांनी रामराजे निंबाळकर हे पर्यायी उमेदवार सुचवले आहेत. त्यावर बोलताना उदयनराजे आणि माझे नऊ ठिकाणहून नातेसंबंध आहे. त्यामूळे यातच निवडणूकीचे उत्तर सामाविले आहे असे मिश्कीलपणे त्यांनी उत्तर दिले. अर्थात, वरच्या राजकारणात न्या असे मी १९९९ पासून शरद पवार यांना सांगत आहे. यंदाची लोकसभा निवडणूक ही तर देशाच्या पुढिल वाटचालीची दिशा ठरवणार असल्याने लोकसभा निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकRamaraje Nimbalkarरामराजे निंबाळकरPoliticsराजकारण