लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : १९ वर्षांआधी मृत व्यक्तींकडून मालमत्ता खरेदी केल्याचा दस्तावेज बनविण्यात आल्याची घटना येथील दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात घडल्याची माहिती उजेडात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.यामुळे दुय्यम निबंधक विभागातील अधिकारी, सिटी सर्व्हे अधिकारी, खरेदी करून देणारे-घेणारे हे सगळे चौकशीच्या भोवऱ्यात आले आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.आधारकार्डसोबत साक्षीदाराचाही खरेदीदस्त, सिटीसर्व्हेलाही नोंद !ाांदगाव येथील विठ्ठल साखरचंद मोरे हे २००१ मध्ये मयत झाले असून, त्यांच्या नावाची मालमत्ता चक्क २०१९मध्ये विकली गेली असून, त्यात त्यांचे आधार कार्डसोबत, ओळखतो म्हणून साक्षीदार असे खरेदीदस्त झाले आहे. खरेदी करून देणारा इसम जर २००१ मध्येच मृत्यू पावला आहे. ाृत व्यक्तीच्या नावावरील मालमत्तेची खरेदी होते, सिटी सर्व्हेला नोंददेखील होते ! म्हणजे यात सत्यता असेल तर दुय्यम निबंधक विभागातील अधिकारी, सिटी सर्व्हे विभागातील अधिकारी, खरेदी करून देणारे-घेणारे हे सगळे चौकशीच्या भोवºयात येतात. काही वर्षे आधी तत्कालीन दुय्यम निबंधक यांनी शर्तीच्या जमिनीचे व्यवहार नोंदविताना लाचेची मागणी केल्याने ते लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याची आठवण या घटनेमुळे ताजी झाली.खरेदी-विक्र ी म्हटले की, पैशांची देवाण-घेवाण अंगवळणी पडल्यासारखी आहे, हे सर्वश्रुत आहे. मात्र मृत व्यक्ती खरेदीदाराकडून १,६०,००० रु पये घेतो. हे कल्पनेत बसणारे नसले तरी ते वास्तव आहे. मृत्यूच्या दाखल्यात मयताच्या वडिलांचे नाव साखरचंद असले तरी आधार कार्डवर व इतर दस्तावेजात सकरू असा नावाचा उल्लेख आहे. ही शुद्धलेखनाची चूक आहे की दुसरे काही, हा संशोधनाचा विषय आहे.
मृत व्यक्तीच्या नावाने बनविले दस्तावेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:44 IST
नांदगाव : १९ वर्षांआधी मृत व्यक्तींकडून मालमत्ता खरेदी केल्याचा दस्तावेज बनविण्यात आल्याची घटना येथील दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात घडल्याची माहिती उजेडात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मृत व्यक्तीच्या नावाने बनविले दस्तावेज
ठळक मुद्देनांदगाव दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार उघडकीस