शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांना अंधश्रद्धाविरोधी प्रशिक्षणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 01:14 IST

पुण्यासारख्या शहरात एका नामांकित रुग्णालयात रुग्णाला बरे करण्यासाठी मांत्रिक बोलवला जातो आणि त्याचा उपयोग तर काही होत नाहीच, परंतु हलगर्जीपणामुळे महिला रुग्णाचा बळी जातो, ही पुरोगामी महाराष्टÑाला धक्का देणारी बाब आहे. केवळ पदवी घेतली म्हणजे ज्ञान येते असे नाही असेच यातून दिसून आले असून, आता अशाप्रकारांना टाळण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांना अंधश्रद्धा विरोधातील प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

महेंद्र दातरंगे।पुण्यासारख्या शहरात एका नामांकित रुग्णालयात रुग्णाला बरे करण्यासाठी मांत्रिक बोलवला जातो आणि त्याचा उपयोग तर काही होत नाहीच, परंतु हलगर्जीपणामुळे महिला रुग्णाचा बळी जातो, ही पुरोगामी महाराष्टÑाला धक्का देणारी बाब आहे. केवळ पदवी घेतली म्हणजे ज्ञान येते असे नाही असेच यातून दिसून आले असून, आता अशाप्रकारांना टाळण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांना अंधश्रद्धा विरोधातील प्रशिक्षण देण्याची गरज आहे.  जो अज्ञानी आहे किंवा विज्ञानावर श्रद्धा नाही अशा एखाद्या व्यक्तीने आता आजाराच्या अगतिकतेपोटी एखाद्या बाबा-बुवाला बोलवणे हे चुकीचे असले तरी ते मान्य करण्यासारखे आहे. परंतु येथे विज्ञानाची पदवी घेऊन विज्ञानाला नाकारले जात असेल तर पदवी काय कामाची? असा प्रश्न निर्माण होतो.  खरे तर वैद्यकीय पदवी हीच विज्ञाननिष्ठतेची पायरी आहे. परंतु अशावेळी एखादा डॉक्टर आपल्याकडून रुग्णाला बरे वाटणे शक्य नाही म्हणून अंधश्रद्धेच्या म्हणजेच अज्ञानाच्या आहारी जातो हेच धक्कादायक आहे. देशाने प्रगती केली. मोबाइल, इंटरनेट आणि संगणकाचे जाळे हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनले, परंतु तरीही एकविसाव्या शतकात राहणाऱ्या अनेकांची मानसिकता ही अकराव्या आणि बाराव्या शतकातील आहे, हेच दाखवणारी ही घटना आहे. त्यातल्या त्यात पुणेसारख्या शहरात जेथे महात्मा फुले यांनी पुरोगामित्व शिकवले आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचा वसा घेतला त्या ठिकाणी अशाप्रकारची घटना ही अधिक वेदनादायी आहे.  पुणे हे विद्येचे माहेर घर मानले गेले. परंतु डॉ. दाभोलकर यांच्या घटनेचा तपास करणाºया उच्चपदस्थ पोलीस अधिकाºयांनी प्लॅँचेटचा प्रयोग करणे ही धक्कादायक बाब तसेच अलीकडेच पिंप्री- चिंचवड येथेही अंधश्रद्धेचा एक प्रकार घडला. त्यामुळे ‘पुणे आता विद्येचे माहेर आहे की अंधश्रद्धे’चे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. सदरची घटना घडल्यानंतर आता रुग्णालयाने संबंधित फरार डॉक्टरला पकडण्यासाठी आणि त्याच्याकडील वैद्यकीय परवाना रद्द करण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे संबंधित डॉक्टरने आपल्याकडून रुग्ण बरा होत नसेल तर त्याला दुसºया तज्ज्ञ डॉक्टरकडे शिफारस करण्याऐवजी अंधश्रद्धेचा वापर केल्याने त्याच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची गरज आहे, तर अशाप्रकारांना भविष्यात आळा बसू शकेल. एकंदरच नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर येथे यापूर्वी शासकीय आरोग्य केंद्रात अशाच प्रकारे मांत्रिकाला पाचारण करण्याचा प्रकार घडला होता. त्यापाठोपाठ अशाप्रकारच्या घटना घडत असल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनने त्याची दखल घ्यायला हवी. त्याचप्रमाणे डॉक्टरांनीच अंधश्रद्धेपासून दूर ठेवावी यासाठी मोहीम राबविण्याची गरज असून, अशाप्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समिती सर्व प्रकारे सहकार्य करण्यास आणि प्रशिक्षण देण्यास तयार आहे.(लेखक महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाशिक जिल्हा शाखेचे कार्यवाह आहेत.)

टॅग्स :Nashikनाशिकdocterडॉक्टर