शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रेमडेसिविरचे ‘ब्लॅक’ करताना डॉक्टर ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 01:32 IST

शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असताना दुसरीकडे मात्र ‘रेमडेसिविर’चा काळाबाजार करताना एका डॉक्टरला अन्न औषध प्रशासन व पोलिसांच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देअन्न औषध प्रशासन व पोलिसांची कारवाई

नाशिक : शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असताना दुसरीकडे मात्र ‘रेमडेसिविर’चा काळाबाजार करताना एका डॉक्टरला अन्न औषध प्रशासन व पोलिसांच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.कोरोना रुग्णांसाठी उपयोगी ठरणारे रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णांना मिळत नसल्याने संताप व्यक्त होत असताना अमृतधाम भागात एक खासगी डॉक्टरच रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याचे उघडकीस आले आहे. रेमडेसिविर इंजेक्शन २५ हजारांना विकणाऱ्या संशयित डॉ. रवींद्र श्रीधर मुळक (४०) यांंना पंचवटी पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा अमृतधाम भागातून ताब्यात घेतले आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, मुळक यांनी तीन रेमडेसिविर इंजेक्शन असल्याचे तक्रारदारास सांगितले होते. एका रेमडेसिविर इंजेक्शनची किंमत २५ हजार रुपये असल्याचेही सांगितले. त्यानुसार तक्रादाराने खरेदीची तयारी दर्शविली. ५ हजार रुपये कमी पडत असल्याचे सांगत एटीएममध्ये जाऊन येतो, असे सांगून तक्रारदाराने १०० क्रमांकावर कॉल करत थेट पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. घटनेची माहिती पंचवटी पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस पथकाने अन्न औषध प्रशासनाच्या पथकाला सोबत घेत घटनास्थळ गाठले. तेथे एका कारमध्ये मुळक हे रेमडेसिविर इंजेक्शनच्या तीन बाटल्या (वायल्स) घेऊन ग्राहकाची येण्याची प्रतीक्षा करत असल्याचे आढळून आले.  पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्या कारची झडती घेऊन इंजेक्शनच्या तीन बाटल्या जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले.  पंचवटी पोलिसांनी तक्रादाराच्या मदतीने मुळक यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. पंचवटी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टर