शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

डॉबरमॅन ‘गुगल’ने लावला काही तासांत घरफोडीचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 18:14 IST

बनावट किल्लीचा वापर करत घराचा मुख्य दरवाजा उघडून खोडनेगरमधील अजमुल्ला अन्सारी यांच्या घरातून ८० हजाराची रोकड व एक तोळे वजनाचे दागिणे असा एकूण ९० हजारांचा ऐवज काही दिवसांपुर्वीच चोरट्याने लुटून पोबारा केला होता.

ठळक मुद्देरोकड व दागिने असा ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

नाशिक : घरफोड्या करणारे गुन्हेगार अनेकदा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होतात किंवा त्यांना बेड्या ठोकण्यासाठी गुन्हे शोध पथक व गुन्हे शाखेला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते; मात्र शहर पोलीस श्वान पथकातील अत्यंत चलाख अन् बुध्दीवान अशा गुगल या प्रशिक्षित श्वानाने काही तासांत एका घरफोडीच्या गुन्ह्यातील गुन्हेगाराचा माग काढून दिल्याने पोलिसांना तत्काळ त्यास बेड्या ठोकता आल्या.बनावट किल्लीचा वापर करत घराचा मुख्य दरवाजा उघडून खोडनेगरमधील अजमुल्ला अन्सारी यांच्या घरातून ८० हजाराची रोकड व एक तोळे वजनाचे दागिणे असा एकूण ९० हजारांचा ऐवज काही दिवसांपुर्वीच चोरट्याने लुटून पोबारा केला होता. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी श्वान पथकातील डॉबरमॅन प्रजातीच्या ‘गुगल’ श्वानाला पाचारण करण्यात आले. श्वान हॅन्डलर पोलीस शिपाई गणेश कोंडे, अरुण चव्हाण, चालक सुधीर देसाई हे तत्काल घटनास्थळी पोहचले. कोंडे यांनी गुगलला त्या घरात फिरविले. यावेळी चोरट्याने फेकून दिलेला दागिण्यांचा रिकामा बॉक्स, पर्स आदि वस्तू गुगलने यावेळी हुंगल्या आणि तत्काळ त्या वासानुसार त्याने कोंडे यांना घेऊन माग दाखविण्यास सुरुवात केली. परिसरात गुगल धावत असताना औत्सुक्याचा विषय ठरला. धावत-धावत गुगल थेट चक्क एका महिलेजवळ जाऊन थांबला. यावेळी त्याच्यामागे असलेल्या पोलिसांनी तत्काळ त्या महिलेला तेथेच थांबण्यास सांगितले. महिला पोलिसांच्या मदतीने त्या संशयित महिलेची चौकशी करण्यात आली. यावेळी तिने मुज्जफर शेख नावाचा व्यक्ती अन्सारी यांच्या घरी आल्याची माहिती दिली. या माहितीवरुन पोलिसांनी सातपूरजवळील सोमेश्वर कॉलनीमधून संशयित गुन्हेगार मुज्जफरच्या मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून पोलिसांनी रोकड व दागिने असा ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे....ये जोडी हैं नंबर-१शहर पोलीस आयुक्तालयातील श्वान पथकात असलेला तीन वर्षे वयाचा डॉबरमॅन गुगल, पाच वर्षे वयाचा जर्मन शेफर्ड मॅक्स या दोन्ही श्वानांची जोडी नंबर-१म्हणून ओळखली जाते. यापुर्वीही या दोन्ही श्वानांच्या नावावर विविध गुन्ह्यांचा छडा लावल्याची नोंद आहे. गुन्हेगारांचा माग काढत्यात हे श्वान अत्यंत तरबेज आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत आपल्या कामगिरीमुळेच मॅक्सने सुवर्ण तर गुगलने कांस्यपदक मिळविले होते. मॅक्स हा अंमली पदार्थ शोधक म्हणून ओळखला जातो आणि गुगल हा अन्यप्रकारच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी शहर पोलीस दलात प्रसिध्द आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयdogकुत्राRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारी