शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उद्या माध्यान्हपर्यंत करा घरातील बाप्पांची प्राणप्रतिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 01:16 IST

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विघ्नहर्ता बाप्पाचे ११ दिवस अगोदर आगमन होत असून, शनिवारी (दि. २२) भाद्रपद शु. चतुर्थीला घरोघरी विधिवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:४७ ते दुपारी १:५७ पर्यंत घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येणार असल्याचे पंचांगकर्त्यांनी म्हटले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना मात्र मध्यान्हानंतरदेखील करता येऊ शकेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपंचांगकर्त्यांकडून मुहूर्त : २५ आॅगस्टला अनुराधा नक्षत्रावर गौरींना आवाहन

नाशिक : मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विघ्नहर्ता बाप्पाचे ११ दिवस अगोदर आगमन होत असून, शनिवारी (दि. २२) भाद्रपद शु. चतुर्थीला घरोघरी विधिवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:४७ ते दुपारी १:५७ पर्यंत घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येणार असल्याचे पंचांगकर्त्यांनी म्हटले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना मात्र मध्यान्हानंतरदेखील करता येऊ शकेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.अवघ्या काही तासांवर बाप्पाचे आगमन येऊन ठेपले आहे. त्यामुळे घरोघरी आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. गणेशमूर्ती स्टॉलवर होणारी गर्दी आणि त्यातून वाढणारा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेकांनी अगोदरच बाप्पांची मूर्ती घरी आणून ठेवली आहे तर अनेकांनी मूर्ती आरक्षित करून ठेवली आहे. शनिवारी बाप्पांचे आगमन होईल, त्याबाबाबत दाते पंचांगचे मोहनराव दाते यांनी म्हटले आहे, शनिवारी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४.४७ वाजेपासून ते दुपारी १.५७ वाजेपर्यंत गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना करता येणार आहे. त्याकरिता भद्रादी (विष्टी) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही.बुधवारी करा गौरी पूजनमंगळवार, दिनांक २५ आॅगस्ट रोजी अनुराधा नक्षत्रावर म्हणजे दुपारी १:५९ नंतर गौरी आवाहन करता येईल, ज्येष्ठा नक्षत्र मध्यान्ही असलेल्या दिवशी पूजन करावे, असे असल्याने दि. २६ रोजी बुधवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने दि. २७ रोजी गुरुवारी दुपारी १२:३७ नंतर गौरी विसर्जन करता येईल. काही वेळेस गौरी आवाहन किंवा विसजर्नाकरिता ठरावीक वेळेची मर्यादा नसते मात्र यावर्षी आवाहन व विसजर्नाकरिता मर्यादा दिलेली आहे त्या मर्यादेत कधीही आवाहन आणि विसर्जन करता येईल.

टॅग्स :NashikनाशिकGaneshotsavगणेशोत्सव