शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

यशाची प्राप्ती झाल्याशिवाय थांबू नका : स्वरुपानंद सरस्वती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 15:05 IST

मिळालेल्या यशानंतरही पुढेही यश मिळविण्यासाठी आकाश मोकळे आहे. म्हणून एका यशाने हुरळून जाऊ नका आणि यश मिळविल्यानंतरही थांबू नका,

ठळक मुद्दे एका यशाने हुरळून जाऊ नका आणि यश मिळविल्यानंतरही थांबू नकाएचपीटी कला व आरवायके विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण सभारंभा

नाशिक: यश मिळविण्यासाठी मनूष्य आयुष्यभर धडपड करत असतो. मात्र एकदा यश संपादन झाले की त्याची गोडी वेगळीच असते. तसेच मिळालेल्या यशानंतरही पुढेही यश मिळविण्यासाठी आकाश मोकळे आहे. म्हणून एका यशाने हुरळून जाऊ नका आणि यश मिळविल्यानंतरही थांबू नका, असे पुणे येथील श्रुतिसागर आश्रमाचे प्रमुख स्वामी स्वरु पानंद सरस्वती यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.       एचपीटी कला व आरवायके विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण सभारंभाचा कार्यक्रम मंगळवारी (दि.१४) उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जीवनात असामान्य यश मिळविण्यासाठी असामान्य ध्येय असले पाहिजे. शिक्षक मार्गदर्शन, प्रेरणा आणि स्फूर्ती देतात, पण विद्यार्थ्यांना स्वत:लाच घडवायचे आहे. आपण पुढे जात असताना सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे, असेही स्वामींनी सांगितले. अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा महासंचालक डॉ. मो.स. गोसावी होते. वर्षभरात विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी बजावलेल्या कामगिरीचा आढावा प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषणात दिला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्या डॉ. मृणालिनी देशपांडे यांनी करु न दिला. सूत्रसंचालन डॉ. यु. जी. बारस्कर, प्रा. बी. यू. पाटील आणि डॉ. जे. एम. नंदागवळी यांनी केले. तर आभारप्रदर्शन उपप्राचार्या डॉ. वृन्दा भार्गवे यांनी केले.यांचा झाला गौरवसर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सागर पाटील व अमोल सोनवणे तर सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून क्षमा देशपांडे आणि महिमा ठोंबरे यांना सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून ज्ञानेश्वरी देवरे आणि सागर रवींद्र पाटील यांना गौरविण्यात आले. तर आदर्श शिक्षकेतर कर्मचारी म्हणून ए. जी. गायधनी , पी. सी. कांबळे , एस. एस. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिकcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी