शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

७० रुग्णालयांना लागले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:19 IST

महापालिकेने केलेल्या आवाहनानंतरही नियमांची पूर्तता करू न शकलेली ३१९ रुग्णालये अनधिकृत ठरविण्यात आली आहेत. या रुग्णालयांना आता महापालिकेने रुग्णालय बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या असून, रुग्णांना दाखल करून घेऊ नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, ७० रुग्णालयचालकांनी आपली रुग्णालये बंद केल्याचे यापूर्वीच महापालिकेला कळविले आहे.

नाशिक : महापालिकेने केलेल्या आवाहनानंतरही नियमांची पूर्तता करू न शकलेली ३१९ रुग्णालये अनधिकृत ठरविण्यात आली आहेत. या रुग्णालयांना आता महापालिकेने रुग्णालय बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या असून, रुग्णांना दाखल करून घेऊ नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, ७० रुग्णालयचालकांनी आपली रुग्णालये बंद केल्याचे यापूर्वीच महापालिकेला कळविले आहे.मुंबई शुश्रूषागृह अधिनियम १९४९ व सुधारित नियम २००६ नुसार महापालिका क्षेत्रातील रुग्णालये, नर्सिंग होम्स, प्रसूतिगृहचालकांनी महापालिकेकडे नोंदणी करणे व विहित कालावधित परवाना नूतनीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परवाना नूतनीकरणासाठी नगररचना व अग्निशामक विभागाचा ना हरकत दाखलादेखील असणे आवश्यक आहे. परंतु महापालिका क्षेत्रातील अनेक जुनी रुग्णालये, प्रसूतिगृह निवासी क्षेत्रात असल्यामुळे तसेच इमारतीच्या वापरात बदलाबाबत संबंधितांना ३१ मार्चच्या आत नोंदणी व नूतनीकरण सक्तीचे केले होते. मात्र, या कालावधित मनपा क्षेत्रातील ५८४ पैकी २६५ रुग्णालयांनीच परवाना नूतनीकरण केले. सुमारे ३१९ रुग्णालयांनी नियमांची पूर्तता न केल्याने त्यांना अनधिकृत ठरविण्यात आले. त्यानुसार, संबंधितांना रुग्णालय बंद करण्याच्या नोटिसाही काढल्या आहेत. या रुग्णालयात रुग्णांना दाखल करून घेऊ नये, अशा नोटिसा रुग्णालयांबाहेर लावल्या जात आहेत.संशयास्पद केंद्रांना नोटिसागर्भलिंग निदान करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे धोरण महापालिकेने स्वीकारले आहे. त्यानुसार, शहरातील सोनोग्राफी तसेच गर्भपात केंद्रांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत २६८ पैकी १४२ सोनोग्राफी केंद्रांची तर १२३ पैकी ४८ गर्भपात केंद्रांची तपासणी करण्यात आली असून, संशयास्पद आढळलेल्या दोन सोनोग्राफी केंद्रांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल