शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पीडितेसह आई फितूर होऊनही डीएनए अहवाल ठरला कळीचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST

स्वत:च्या सोळा वर्षीय सावत्र मुलीवर वारंवार अत्याचार करून गरोदर करणाऱ्या पित्यास निफाडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरवित ...

स्वत:च्या सोळा वर्षीय सावत्र मुलीवर वारंवार अत्याचार करून गरोदर करणाऱ्या पित्यास निफाडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरवित आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. दरम्यान, या प्रकरणात पीडित मुलीसह तिची आईदेखील फितूर होऊनही संशयित व पीडित मुलीचा डीएनए चाचणी अहवाल दोषीला शिक्षा सुनावण्यास पुरेसा ठरल्याने हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

श्रावण ऊर्फ वाळिबा लहानु गायकवाड (३४, रा पिंपळगाव निपाणी, ता. निफाड) याने स्वत:च्या सोळा वर्षीय सावत्र मुलीला शेतात गवत आणण्यासाठी नेऊन जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीची मासिक पाळी थांबल्याने तिच्या आईने तिला तपासणीसाठी डाॅक्टरांकडे नेल्यावर ती गरोदर असल्याची बाब पुढे आली. त्यानंतर पीडितेस जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी पीडितेने सावत्र बापानेच क्रुरकर्म केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून सायखेडा पोलीस स्टेशनमध्ये ३७६ (२), एफ‌एन ५०६ ,बाललैंगिक अत्याचार कायदा कलम ३ ,६ अन्वये गुन्हा नोंदवून संशयितास अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान पीडित‌ मुलीसह तिच्या गर्भाचे व नराधम पित्याचे नमुने डीएनए नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर पीडितेसह तिच्या आईचे जबाब न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदविण्यात आले होते. आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील रामनाथ शिंदे यांनी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, रामचंद्र कर्पे ,डीएनए अहवाल तपासणी करणाऱ्या डाॅ. वैशाली महाजन यांच्यासह १६ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्यावरून आरोपी पित्यानेच आपल्या सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची बाब निष्पन्न झाली. आरोपी गायकवाड यास आजीवन सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

इन्फो...

पीडितेसह आईदेखील‌ झाली होती फितूर

सदर खटल्यातील पीडितेने न्यायालयासमोर साक्ष नोंदविताना सरकारी पक्षाला सहकार्य केले नाही. ती व साक्षीदार आईदेखील फितूर झाली; मात्र आरोपी व पीडितेच्या गर्भातील नमुने डीएनए नमुन्यांची तपासणी केली असता, ते पाॅझिटिव्ह आले. हा अहवाल व पोलिसांनी केलेला तपास यांचे परस्परपुरक धागेदोरे या आधारावर पित्यास न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावल्याचे सहायक जिल्हा सरकारी वकील रामनाथ शिंदे यांनी सांगितले.