सेलिब्रिटी क्रिकेटमध्ये  डीजे किंगमेकर अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:03 AM2018-02-26T01:03:03+5:302018-02-26T01:03:03+5:30

नाट्य आणि चित्रपट कलावंतांसह विविध कलाक्षेत्रांतील कलाकारांच्या सेलिब्रिटी क्रिकेट लीग स्पर्धेचे अजिंक्यपद डी. जे. किंगमेकर या संघाने पटकावले असून, या संघाकडून खेळणारा अभिनेता चिन्मय उद्गीरकर याने चौकार, षटकारांची आतषबाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

DJ Kingmaker Ajinkya in Celebrity Cricket | सेलिब्रिटी क्रिकेटमध्ये  डीजे किंगमेकर अजिंक्य

सेलिब्रिटी क्रिकेटमध्ये  डीजे किंगमेकर अजिंक्य

Next

नाशिक : नाट्य आणि चित्रपट कलावंतांसह विविध कलाक्षेत्रांतील कलाकारांच्या सेलिब्रिटी क्रिकेट लीग स्पर्धेचे अजिंक्यपद डी. जे. किंगमेकर या संघाने पटकावले असून, या संघाकडून खेळणारा अभिनेता चिन्मय उद्गीरकर याने चौकार, षटकारांची आतषबाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. स्पर्धेतील विजेत्या संघांना पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल व लक्ष्मण सावजी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.  गंगापूररोडवरील सुयोजित व्हिरिडियन व्हॅलीजच्या मैदानावर जनस्थान व्हाट्सअ‍ॅप ग्रुपतर्फे करण्यात आलेल्या या स्पर्धेत लोकेश शेवडे यांच्या स्टोरवेल इलेव्हन, प्रकाश जातेगावकर यांच्या फ्रेंड्स सर्कल इलेव्हन, नंदन दीक्षित यांच्या निर्मित सिल्व्हर स्ट्रोक, डी. जे. हंसवाणी यांच्या डीजे किंगमेकर्स, विश्वास ठाकूर यांच्या टीम विश्वास व अरुण नेवासकर यांच्या नाशिक इलेव्हन या सहा संघांतून स्वप्नील उद्गीरसह अनिता दाते, अंशुमन विचारे, कांचन पगारे, धनश्री क्षीरसागर, किरण भालेराव आदी रंगभूमी कलाकार, गायक, वादक कलाकारांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यातील तीन संघांनी पहिल्या फेरीत विजय मिळविल्यानंतर स्टोअरवेल इलेव्हन व डी.जे. किंगमेकर या दोन संघांमध्ये उपांत्य सामना झाला. तर चांगल्या धावगतीच्या जोरावर नाशिक इलेव्हनला थेट फायनलचे तिकीट मिळाले. उपान्त सामन्यात चिन्मय उद्गीरकरने आक्रमक खेळ करीत संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर नाशिक इलेव्हन व डी. जे. किंगमेकर या संघांमध्ये अंतिम सामना रंगला. या सामन्यात नाशिक इलेव्हनने ७ षटकांमध्ये डी. जे. किंगमेकरसमोर विजयासाठी ५८ धावांचे लक्ष ठेवले. डी. जे. किंगमेकरने चिन्मयच्या धुवाधार अर्धशतकाच्या जोरावर अंतिम सामन्यात विजय मिळवून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. तर नाशिक इलेव्हनने उपविजेतेपद मिळवले असून, स्टोअरवेल इलेव्हनला तिसºया स्थानावर समाधान मानावे लागले. यंदा आयपीएलच्या धर्तीवर कलावंत खेळाडूंचे खास चॉकलेटच्या अनोख्या लिलाव पद्धतीने सहा वेगवेगळे संघ तयार करण्यात आले होते. सुभाष दसरकर यांनी स्पर्धेतील सर्व सामन्यांचे समालोचन केले.
वैयक्तिक पारितोषिके
सेलिब्रिटी क्रिकेटमध्ये चिन्मय उद्गीरकरने अंतिम सामन्यात नाबाद अर्धशतक ठोकले. त्याला उपान्त्य व अंतिम सामन्यासाठी सामनावीरासोबतच उत्कृष्ट फलंदाज व मालिकावीराचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तर संदीप लोंढे उत्कृष्ट गोलंदाज, सचिन शिंदे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व नूपुर सावजी यांना उत्कष्ट महिला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

Web Title: DJ Kingmaker Ajinkya in Celebrity Cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा