शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा पालिकेसमोर दिव्यांगांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 01:38 IST

राज्यातील दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजना त्यांच्यापर्यंत प्राधान्याने पोहोचाव्यात तसेच २०१६च्या दिव्यांग हक्क अधिनियम कायद्याची कडक अंमलबजावणी करावी यांसह इतर प्रमुख मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (दि.१७) बागलाण तालुका प्रहार अपंग क्रांती संघटनेतर्फेपालिका प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन छेडून शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

सटाणा : राज्यातील दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजना त्यांच्यापर्यंत प्राधान्याने पोहोचाव्यात तसेच २०१६च्या दिव्यांग हक्क अधिनियम कायद्याची कडक अंमलबजावणी करावी यांसह इतर प्रमुख मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (दि.१७) बागलाण तालुका प्रहार अपंग क्रांती संघटनेतर्फेपालिका प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन छेडून शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.सकाळी बागलाण तालुका प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शेकडो दिव्यांग बांधवांनी येथील पालिक ा प्रवेशद्वारात अचानक ठिय्या दिला. दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांकडे शासन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत उपस्थित दिव्यांग बांधवांनी शासन व प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी आंदोलनकर्त्या दिव्यांग बांधवांची भेट घेऊन चर्चा केली. संघटनेतर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात तालुक्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांगांसाठी राखीव ठेवलेला पाच टक्के निधी अद्यापही वाटप केलेला नाही. हा निधी कोणत्याही अटीशिवाय दिव्यांगांच्या बँक खात्यावर त्वरित वर्ग करावा. तालुक्यातील दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेची वाढीव रकमेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन या योजनांचा लाभ मिळवून द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलनात सुधाकर सोनवणे, नाना कुमावत, शांताराम भाटिया, शेखर परदेशी, राजू जगताप, मोहिद्दीन शेख, मधुकर खैरनार आदींसह शेकडो दिव्यांग सहभागी झाले होते.आदेशाची अंमलबजावणी नाहीमहाराष्ट्र शासनाने दिव्यांग धोरण आखून राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण उत्पन्नाच्या कमीत कमी पाच टक्के निधी दिव्यांगांच्या कौशल्य विकास, स्वयंरोजगार आदी कारणांसाठी वापर केला जावा, असे निर्देश दिलेले आहेत; मात्र आजपर्यंत त्या आदेशांची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे दिव्यांगांची ससेहोलपट सुरूच आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagitationआंदोलन