शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी : आज लक्ष्मीपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 01:00 IST

दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव हा सणाला धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, अश्विन अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजन आणि त्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा तथा बलिप्रतिपदा साजरी करण्यात येते.

नाशिक : दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव हा सणाला धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, अश्विन अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजन आणि त्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा तथा बलिप्रतिपदा साजरी करण्यात येते. रविवारी (दि. २७) नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. यानिमित्त पहाटे स्नान करून मनोभावे लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे.अश्विन शुद्ध चतुर्दशी (नरकचतुर्दशी) या दिवशी सूर्योदयापूर्वी अंगाला तेल लावून उष्णोदकाने स्नान करण्याची प्रथा आहे. तसेच यावेळी आघाडा वनस्पतीने अंगावर शिंपन करून नंतर यमराजाला वंदन व जलांजली देण्याची प्रथा आहे. काही समाजात या दिवशी पितृस्मरण करण्याची प्रथा आहे. आपल्या पूर्वजांचे स्मरण करून कुटुंब आणि नव्या पिढीला आरोग्य, सुखसमृद्धी लाभावी अशी प्रार्थना करण्यात येते. नरकचतुर्दशीसंबंधी एक पौराणिक कथादेखील असून, यादिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून बंदीवासातील सोळा हजार स्त्रियांना मुक्त केले. मृत्यूसमयी नरकासुराने वर मागितला होता की, ‘आजच्या दिवशी जो मंगल स्नान करेल त्याला नरकाची पिडा होऊ नये’, तेव्हापासून नरकचतुर्दशी मानली जाते, या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करतात. लक्ष्मीपूजनाचा विधी रविवारी सायंकाळी होणार आहे. लक्ष्मीपूजनासाठी व्यापारी, नागरिक उत्सुक आहेत. त्यानिमित्त झेंडूची फुले, लक्ष्मीपूजनाचे साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी दिसून आली.असा आहे मुहूर्तदीपोत्सवाचा आनंद द्विगुणीत करणाऱ्या लक्ष्मीपूजनासाठी व्यापारीवर्गासह सर्वसामान्य नागरिक उत्सुक आहे. रविवारी (दि. २७) सकाळी ९.२७ ते १0.५३ लाभ मुहूर्त असून, सकाळी १0.५३ ते १२.१९ अमृत मुहूर्त आहे. तसेच दुपारी १.४५ ते ३.११ पर्यंत शुभ मुहूर्त असून, सायंकाळी ६.0२ ते ९.११ पर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त अशी माहिती ब्रह्मवृंदांनी दिली.

टॅग्स :DiwaliदिवाळीNashikनाशिक