शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
5
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
8
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
9
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
10
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
11
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
12
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
13
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
14
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
15
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
16
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
17
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
18
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
19
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

सामाजिक संस्थांच्या वतीने दिवाळी फराळचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:36 AM

दिवाळीनिमित्त विविध सामाजिक संस्था आणि सेवाभावी संघटनांच्या वतीने गरीब विद्यार्थी तसेच आदिवासी बांधवांना कपडे आणि फराळाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेतला.

नाशिक : दिवाळीनिमित्त विविध सामाजिक संस्था आणि सेवाभावी संघटनांच्या वतीने गरीब विद्यार्थी तसेच आदिवासी बांधवांना कपडे आणि फराळाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेतला.  समाजातील गरीब विद्यार्थ्यांचा दिवाळी उत्सव द्विगुणीत करण्यासाठी बागेश्री वाद्यवृंदातील कलाकार बालअभिनेत्री श्रेया गायकवाड, गायिका शर्वरी पद्मनाभी, ऋषीकेश गायकवाड, साक्षी व रुची झेंडे यांच्या हस्ते पंचवटी परिसरातील काळाराम मंदिर तसेच विविध सिग्नलजवळील गरीब मुला-मुलींना मिठाई वाटप करण्यात आली, अशी माहिती बागेश्री वाद्यवृंदाचे संचालक चारुदत्त दीक्षित यांनी दिली. याप्रसंगी तबलावादक सुधीर करंजीकर, नाट्य कलावंत दीपक दीक्षित, ज्येष्ठ हेमंत कुलकर्णी, मीनाक्षी वाळवेकर, वेदश्री करंजीकर, सोनल अधिकारी, सोनाली सप्तर्षी आदी मान्यवर कलावंत उपस्थित होते. नॅबचे सचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.नॅब कार्यशाळेत दिवाळीनॅब कार्यशाळेत दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी दीपावली उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सलीम शेख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी रामेश्वर कलंत्री उपस्थित होते. याप्रसंगी लाभशंकर पंड्या, राजेश नागरे, हर्षल गडकरी, मोनल महेश, अ‍ॅड. अजय निकम, राजेंद्र वाणी, जयप्रकाश मुथा यांच्या वतीने कपडे, ड्रेस, दिवाळी फराळ, मिठाई आदींची विद्यार्थ्यांना भेट देण्यात आली. यावेळी कार्यक्रमास संस्थेचे मानद सचिव गोपी मयूर, उपाध्यक्ष सूर्यभान साळुंखे, रवींद्र केडिया, रवींद्र कांगणे, संपत जोंधळे, दत्तात्रय गुळवे आदी उपस्थित होते. कार्यशाळा अध्यक्ष मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.निरीक्षणगृहात खरी दिवाळीशहरातील आनंद अकाउंट्सच्या विद्यार्थ्यांनी निरीक्षणगृहात खरी दिवाळी साजरी केली. यावेळी शंभर किलो फराळाबरोबरच प्लेट्स तसेच सिलिंग फॅनची दिवाळी भेट निरीक्षणगृहातील मुलांना देण्यात आली. कार्यक्रमास भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक चोपडा, अतुल आचळे, निरीक्षणगृहाचे मानद संचालक चंदुलाल शाह, भारतीय जैन संघटनेचे शहराध्यक्ष यतीश डुंगरवाल, महावीर इंटरनॅशनलचे अध्यक्ष अनिल नहार, राजेंद्र बाफना आदि उपस्थित होते.दिवाळी झाली गोडनाशिक फटाका असोसिएशनच्या वतीने निरीक्षणगृहातील मुला- मुलींना फटाके आणि मिठाईचे वाटप करून दिवाळी गोड करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ तसेच महंत भक्तिचरणदास महाराज यांच्या हस्ते मुलांना फराळाचे वाटप करण्यात आले. व्यवसाय करताना सामाजिक जाणिवेतून काम करण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत यावेळी राजू भुजबळ यांनी व्यक्त केले. तर भक्तिचरणदास यांनी मायेचा आधार देण्याचे कार्य अखंडपणे सुरू ठेवण्याचे आवाहन केले. याप्रसंगी निरीक्षणगृहातील मुलींनी व्यापाºयांना ओवाळले. यावेळी शंकरराव बर्वे, जयप्रकाश जातेगावकर, पंकज काळे, राहुल बर्वे, प्रशांत चंद्रात्रे, अमोल बर्वे, आनंद करंजकर, योगेश सोनवरे, गणेश बर्वे, गणेश रत्न, समर्थ काळे, चंद्रात्रे, अशोक ढोले, अदित्य अक्कर, सचिन रत्ने, नरेंद्र पाटील, आकाश देसाई आदी उपस्थित होते.