शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनिमित्त घरोघरी स्वच्छतेच्या कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:05 IST

दिवाळीनिमित्त गृहिणी वर्गाकडून घरोघरी साफसफाई व स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आल्याने घंटागाडीच्या केरकचरा संकलनात दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे घंटागाडी वरील कामगारांवर कामाचा चांगलाच ताण वाढला आहे.

नाशिकरोड : दिवाळीनिमित्त गृहिणी वर्गाकडून घरोघरी साफसफाई व स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आल्याने घंटागाडीच्या केरकचरा संकलनात दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे घंटागाडी वरील कामगारांवर कामाचा चांगलाच ताण वाढला आहे.  लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज अशा दिवाळीच्या मोठ्या सणामुळे श्रीमंताच्या बंगल्यापासून ते गरीबाच्या झोपडीमध्ये साफसफाई, स्वच्छतेची कामे गृहिणी वर्गाकडून केली जातात. घरात झाडझूड करून धुवून संसार उपयोगी वस्तूंना ऊन देऊन सध्या घरोघरी साफसफाईची कामे युद्ध- पातळीवर केली जात आहे. अवघ्या आठवडाभरावर दीपावली येऊन ठेपल्याने घरातील स्वच्छतेची कामे उरकून गृहिणींना फराळदेखील करावयाचा आहे.  घरोघरी साफसफाईची कामे केली जात असल्याने फार मोठ्या प्रमाणात केरकचरा, खराब व तुटक्या, फुटलेल्या वस्तू घंटागाडीत जमा केल्या जात आहेत. एका प्रभागात विभागवार चार घंटागाड्या असून, त्यांना ठरवून दिलेल्या विभागानुसार निम्म्या परिसरात घंटागाडी केरकचऱ्याने गच्च भरून जात आहे. नेहमी ओला कचरा जास्त तर सुका कचरा कमी प्रमाणात असतो; मात्र दिवाळीतील साफसफाईच्या कामांमुळे सुका कचरादेखील वाढला आहे. यामुळे घंटागाड्यांना त्यांना ठरवून दिलेल्या एरियात दोन फेºया मारून घराघरांचा केरकचरा संकलित करावा लागत आहे.  यामुळे घंटागाडी कामगारांवर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण वाढला आहे. दुप्पट प्रमाणात केरकचरा वाढल्याने ते संकलित करताना विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे काही सार्वजनिक जागेवर पडणारा केरकचरा, घाण संकलन करणे अवघड होऊन बसले आहे.रंगरंगोटीची कामेही वेगातदिवाळी सणासाठीची लगबग दिवसेंदिवस वाढतच असून, आता घरगुती कामांना वेग आला आहे. घराची साफसफाई करण्याबरोबरच घराला रंग देण्याची कामेही सुरू झाली आहेत. यंदा रंगांच्या किमतींमध्ये काही प्रमाणात वाढ झाली असली तरी भारतीय कंपन्यांनी तयार केलेल्या रंगांची मागणी कायम आहे.

टॅग्स :DiwaliदिवाळीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका