शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीचे विभागीय अधिकारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:19 IST

महापालिकेतील कामचुकार, कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांच्याविरुद्ध कारवाईचे सत्र सुरूच असून, बुधवारी (दि. २८) पंचवटी विभागाचे प्रभारी विभागीय अधिकारी भीमाशंकर यल्लप्पा शिंगाडे यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करत निलंबित करण्यात आले. प्रभारी आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांच्याकडील पदभार काढून घेत त्यांच्या जागेवर डॉ. सचिन हिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिक : महापालिकेतील कामचुकार, कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांच्याविरुद्ध कारवाईचे सत्र सुरूच असून, बुधवारी (दि. २८) पंचवटी विभागाचे प्रभारी विभागीय अधिकारी भीमाशंकर यल्लप्पा शिंगाडे यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करत निलंबित करण्यात आले. प्रभारी आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांच्याकडील पदभार काढून घेत त्यांच्या जागेवर डॉ. सचिन हिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरसचिव आर. आर. गोसावी यांच्याकडे पुन्हा एकदा पंचवटी विभागीय अधिकारीपदाची सूत्रे सोपविण्यात आली असून, नगरसचिवपदी गोरखनाथ आव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय गेल्या १२ वर्षांपासून कामावर गैरहजर असलेल्या एका शिपायासही सेवेतून कमी करत घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.  महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी प्रशासनात अनेक फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. कर्तव्यात कसूर करणाºया, कामचुकार अधिकारी व कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई केली जात आहे, तर असमाधानकारक कामामुळे काही अधिकाºयांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. बुधवारी (दि. २८) महापालिका प्रशासनाने असमाधानकारक कामकाजाबद्दल पंचवटी विभागाचे प्रभारी विभागीय अधिकारी भीमाशंकर यल्लप्पा शिंगाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. गेल्या महिनाभरात प्रशासनाकडून नेमून देण्यात आलेल्या विविध कामांबाबत समाधानकारक प्रगती न केल्याने शिंगाडे यांना तशी नोटीसही बजावण्यात आली होती. अखेर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. शिंगाडे यांच्या जागेवर नगरसचिवपदी महिनाभरापूर्वीच नेमण्यात आलेले आर. आर. गोसावी यांची पुन्हा एकदा पंचवटीचे विभागीय अधिकारीपदी रवानगी करण्यात आली आहे. गोसावी यांच्याकडील नगरसचिवपदाचा कार्यभार सहायक नगरसचिव गोरखनाथ आव्हाळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याशिवाय सन १७ नोव्हेंबर २००५ पासून कामावर सतत गैरहजर राहिलेल्या पश्चिम विभागीय कार्यालयातील शिपाई सुनील शांताराम मिंधे यास सेवेतून कमी करण्यात आले आहे. मिंधे याची विभागीय चौकशी लावण्यात आलेली होती. त्यात तो दोषी आढळल्याने त्याला सेवेतून कमी करण्याची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.शिक्षकांसाठी प्रशिक्षण 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे