शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

नाशिकच्या पश्चिम प्रभाग समिती सभेत वृक्षछाटणीसाठी विभागीय स्तरावरच परवानगीचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 15:14 IST

सेवा मिळण्यास विलंबाची तक्रार : दुभाजकांमधील अस्वच्छतेबद्दल प्रायोजकांना धरले जबाबदार

ठळक मुद्देवृक्षछाटणीसाठी गाड्याच उपलब्ध होत नसल्याची तक्रारदुभाजकांची स्वच्छता परिसरातील कमर्शिअल कॉम्प्लेक्समधील व्यावसायिकांकडून करुन घेण्याची सूचना

नाशिक - पथदीप तसेच विद्युत तारांभोवती असणाऱ्या  वृक्षांच्या फांद्या छाटण्यासाठी वृक्ष प्राधिकरणची परवानगी घेण्याच्या प्रक्रियेला विलंब लागत असल्याने वृक्षछाटणीसंबंधीची परवानगी विभागीय स्तरावरच मिळण्याबाबतचा ठराव पश्चिम प्रभाग समितीच्या सभेत करण्यात आला. दरम्यान, रस्त्यांवरील दुभाजकांच्या देखभालीकडे संबंधित प्रायोजकांचे दुर्लक्ष होत असल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.महापालिकेच्या पश्चिम प्रभाग समितीची सभा सभापती डॉ. हेमलता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी, प्रभागांमधील वृक्षछाटणीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. वृक्षछाटणीसाठी गाड्याच उपलब्ध होत नसल्याची तक्रार समीर कांबळे यांनी केली. त्यावर, उद्यान निरीक्षक पांडे यांनी पश्चिम प्रभागासाठी चार गाड्या असल्याचे सांगत ३५ उद्यानांसह दुभाजकांचीही स्वच्छता करावी लागत असल्याने विलंब होत असल्याची कबुली दिली. त्यासाठी पुरेसे मनुष्यबळही उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. वृक्षछाटणीसाठी वृक्ष प्राधिकरणची परवानगी घ्यावी लागते. प्राधिकरणची सभा दर महिन्याला एकदा होते. छाटणीचा प्रस्ताव दिल्यानंतर मंजुरीसह त्याबाबतचा ठराव प्राप्त होईपर्यंत बराच अवधी निघून जातो. त्यामुळे छाटणीस विलंब होत असल्याचे स्पष्टीकरण उद्यान निरीक्षकांनी केल्यानंतर, सभापतींनी विभागीय स्तरावरच आवश्यक त्या ठिकाणी वृक्षछाटणीची परवानगी मिळावी यासाठी ठराव केला. दरम्यान, सभापती डॉ. पाटील यांनी विभागातील खासगी मालकीच्या खुल्या जागांवर होणारी अस्वच्छता पाहता संबंधितांना नोटीसा बजावण्याचे आदेशित केले. योगेश हिरे यांनी, सदर भूखंडांची साफसफाई महापालिकेने करावी आणि त्याबाबतचे शुल्क संबंधित भूखंडमालकांकडून वसूल करावे. ज्यावेळी भूखंडमालक प्लॉटवर बांधकामासाठी परवानगी घ्यायला येईल, त्यावेळी त्याच्याकडून सदर वसुली करण्याची सूचनाही हिरे यांनी केली. काही उद्यानांमध्ये सुरक्षारक्षक म्हणून निवास करणारे मनपाचे कर्मचारी नसतील, त्यांची यादी तयार करुन त्यांना हटविण्याचीही सूचना यावेळी सदस्यांनी केली. विभागातील दुभाजकांच्या साफसफाईच्या मुद्यावरही चर्चा झाली. सभापतींनी दुभाजकांची स्वच्छता परिसरातील कमर्शिअल कॉम्प्लेक्समधील व्यावसायिकांकडून करुन घेण्याची सूचना केली. यावेळी उद्यान निरीक्षकांनी पश्चिम विभागातील दुभाजकांची देखभाल प्रायोजकांमार्फत केलीच जात नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर, सभापतींनी त्याबाबतची यादी तयार करुन प्रायोजकांची बैठक घेण्याचे आदेशित केले. प्रभागांमध्ये ठेकेदारामार्फत डसबीन पुरविल्या जात असताना त्याची काहीही माहिती नगरसेवकांना दिली जात नसल्याची तक्रार स्वाती भामरे यांनी केली. त्यावर सभापतींनी आरोग्य विभागाकडून माहिती मागविली व डसबीनमुळे पुन्हा कचरा कुंड्यांना निमंत्रण देऊ नका, असेही सुनावले. सभेला, योगेश हिरे, प्रियंका घाटे, वत्सला खैरे, हिमगौरी अहेर-आडके, समीर कांबळे, स्वाती भामरे आदीसह अधिकारी उपस्थित होेते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका