शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग १३: पोटनिवडणुकीत चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 01:18 IST

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीत चुरशीचा सामना होण्याची चिन्हे दिसू लागली असून, बिनविरोध निवडीची शक्यता मावळली आहे. सोमवारी (दि.१९) शिवसेनेकडून स्नेहल संजय चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर माजी नगरसेवक माधुरी मिलिंद जाधव यांनीही अर्ज दाखल केला असून, त्यांनी भाजपाकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीत चुरशीचा सामना होण्याची चिन्हे दिसू लागली असून, बिनविरोध निवडीची शक्यता मावळली आहे. सोमवारी (दि.१९) शिवसेनेकडून स्नेहल संजय चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर माजी नगरसेवक माधुरी मिलिंद जाधव यांनीही अर्ज दाखल केला असून, त्यांनी भाजपाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. दरम्यान, शिवसेना ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरल्याने भाजपानेही निवडणूक लढविण्याची तयारी केली असून, दोघा इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क)मधील मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ६ एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी मंगळवारी (दि.२०) नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. सोमवारी (दि.१९) शिवसेनेचे नवनियुक्त महानगरप्रमुख सचिन मराठे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोटनिवडणुकीसाठी माजी नगरसेवक संजय चव्हाण यांच्या कन्या स्नेहल चव्हाण यांची उमेदवारी घोषित केली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी रोहिदास बहिरम यांच्याकडे स्नेहल चव्हाण यांनी पक्षाच्या एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, मनपातील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, गटनेता विलास शिंदे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, सुधाकर बडगुजर, माजी महापौर यतिन वाघ, रवींद्र जाधव आदी उपस्थित होते. स्नेहल चव्हाण यांनी मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत ९५९३ मते घेतली होती.भोसलेंंना अपक्ष लढण्याचा प्रस्ताव?भोसले कुटुंबीयातील सदस्याने मनसेकडून निवडणूक लढविल्यास पाठिंबा देणे राजकीयदृष्ट्या गैरसोयीचे ठरणार असल्याने भोसले यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत उमेदवारी करावी. तसे झाल्यास भाजपाकडून उमेदवार दिला जाणार नाही, असे आश्वासन देण्यात आल्याचे समजते. त्यामुळेच सोमवारी (दि.१९) वैशाली भोसले यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून ठेवला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक