शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

दिवेआगार गणेश मंदीर दरोडा-हत्याकांडातील फरार अट्टल गुन्हेगारास बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 19:43 IST

सुनावणी पुर्ण होताच त्यास पोलीस बंदोबस्तात रेल्वेतून नागपूरला घेऊन जात असताना भुसावळ रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन काळे हा फरार झाला होता.

ठळक मुद्देदोन वर्षांपुर्वी पोलिसांच्या हातावर दिल्या होत्या तुरीराज्यभरात २८ जबरी गुन्ह्यांत सहभागसहाठिकाणी दरोड्यासह माणसांना ठार मारले आहे

नाशिक: रायगड जिल्ह्यातील दिवेआगार येथ‌ील गणपती मंदिरावर दरोडा टाकून तेथील दोन सुरक्षारक्षकांच्या हत्येप्रकरणी मोक्का न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना दोन वर्षांपुर्वी पोलिसांच्या हातातून निसटून जाण्यास यशस्वी ठरलेल्या अट्टल गुन्हेगाराच्या अखेर येवला पोलिसांनी मोठ्या शिताफीने मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून येवल्यात आठवडाभरापुर्वी झालेल्या घरफोड्यांच्या गुन्ह्यांसह अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सडपातळ बांधा अन‌् साडेचार फूटापेक्षा अधिक उंची नसलेला मात्र वयाच्या १९ वर्षांपासूनच गुन्हेगारीकडे वळून राज्यात संघटित गुन्हेगारीची बीजे पेरुन खून, दरोडे, खूनासह दरोडे, घरफोड्या, जबरी लूट यांसारखे गंभीर स्वरुपाचे राज्यातील विविध जिल्ह्यांत तब्बल २८ गुन्हे दाखल असलेला विशेष मोक्का न्यायालयाने सुनावलेल्या डझनभर आरोपींपैकी एक असलेला सतीश उर्फ सत्या जैनु काळे (२६,रा.बिलवणी, ता.वैजापुर, जि.औरंगाबाद) यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा २०१२साली सुनावली होती. काळे हा नागपूर येथील कारागृहात शिक्षा भोगत असताना २०१८साली एका खटल्याच्या सुनावणीसाठी त्यास निफाड सत्र न्यायालयात पोलिसांनी हजर केले होते. सुनावणी पुर्ण होताच त्यास पोलीस बंदोबस्तात रेल्वेतून नागपूरला घेऊन जात असताना भुसावळ रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन काळे हा फरार झाला होता.१९ ऑक्टोबर २०२० रोजी नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीतील येवला तालुक्यातील खरवंडी, रहाडी या दोन गावांत घरफोड्यांची मालिका रात्रीच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पोलीस अधिक्षक सचिन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या आदेशानुसार सहायक निरक्षक एकनाथ भिसे, उज्वलसिंह राजपुत यांनी विविध तपासपथके तयार केली आणि तालुक्यासह जिल्हाभरात गुन्हेगारांचे झडतीसत्र हाती घेतले.नाव बदलून येवला-वैजापूर सीमेवर वावरयावेळी येवला-वैजापुर सिमेवर मिळालेल्या गोपनीय माहितीच्याअधारे तपासी पथकाने सापळा रचून काळे यास बेड्या ठोकल्या. येवल्यात घरफोड्या केल्यानंतर काळे हा फरार झाला. दोन्ही तालुक्यांच्या परिसरात दोन वर्षांपासून काळे हा शिवा जनार्दन काळे असे नाव बदलून येवला, वैजापूर, औरंगाबाद या शहरांमध्ये वावरत होता.--आंतरराज्यीय टोळीचा प्रमुख असलेला मोक्कांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला अट्टल आरोपी सतीश उर्फ सत्या यास तपासी पथकाने ज्या कौशल्याने व तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने गजाआड केले त्या तपासी पथकाला २५ हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे. दिवेआगार गणपती मंदीरात दरोडा टाकून तेथील दोन सुरक्षारक्षकांची कुऱ्हाडीने निघृणपणे हत्या करुन फरार झालेल्या टोळीमधील सतीश हा प्रमुख आरोपी आहे. त्यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा यापुर्वीच सुनावली आहे. राज्यातील पुणे, महाड, रायगड, औरंगाबाद आदि जिल्ह्यांत त्याच्याविरुध्द २८ गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहे. त्याने सहाठिकाणी दरोड्यासह माणसांना ठार मारले आहे.-सचिन पाटील, अधीक्षक, नाशिक

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसArrestअटक