शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

युतीच्या जागावाटपात आकड्यांचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 02:04 IST

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेत फिफ्टी फिफ्टीचा फार्म्युला लागू होणार की, सेनेला १२० जागा देत भाजपा १६० जागा लढविणार असे जागावाटपाचे वेगवेगळे आकडे जाहीर होत असताना निवडणुकीत युती झाल्यास नाशिक जिल्ह्णातही भाजप-सेनेचे जागावाटप कसे असेल,

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेत फिफ्टी फिफ्टीचा फार्म्युला लागू होणार की, सेनेला १२० जागा देत भाजपा १६० जागा लढविणार असे जागावाटपाचे वेगवेगळे आकडे जाहीर होत असताना निवडणुकीत युती झाल्यास नाशिक जिल्ह्णातही भाजप-सेनेचे जागावाटप कसे असेल, या विषयीची उत्सुकता ताणली गेली आहे. २००९ मध्ये झालेल्या युतीच्या १०-५ जागावाटप यंदा भाजप स्वीकारणार की, शिवसेना कमी जागा घेऊन भाजपला चाल देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या मोठ्या भावाच्या भूमिकेत वावरत असलेल्या भाजपकडून जिल्ह्णात आणखी दोन ते तीन अतिरिक्त जागांचा आग्रह धरला जात असून, त्यामुळे युतीच्या जागावाटपात आकडेच खोडा घालतील, असे दिसू लागले आहे.लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच युतीचे जागावाटप निश्चित झाल्याचा दावा शिवसेना करीत असून, त्यावेळी ठरल्यानुसार विधानसभेच्या फिफ्टी फिफ्टी जागा दोन्ही पक्ष लढवतील तर सत्तेतही समान वाटा सेनेला दिला जाईल, असे ठरले असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगितले जात आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी याची माहिती सर्वप्रथम प्रसिद्धी माध्यमांना दिली त्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही त्याचा पुनरुच्चार केला आहे. प्रत्यक्षात विधानसभेसाठी भाजप सेनेला निम्म्या जागा देण्यास तयार नसल्याचे बोलले जात असून, सेनेला १२० ते १२५ जागा देण्यास भाजप तयार असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे जागावाटपावरूनच युतीची अधिकृत घोषणा होत नसल्याचे जाणकारांचे म्हणणेआहे. राज्यपातळीवर जागावाटपात वेगवेगळे आकडे दररोज जाहीर होत असताना नाशिक जिल्ह्णातही भाजप व सेनेच्या इच्छुकांमध्ये जागा वाटपाच्या आकड्यांवरच चर्चा होत आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी युती तुटल्याने दोन्ही पक्षांनी पंधराही मतदारसंघांत उमेदवार उभे केले. परंतु यंदा अजून तरी युतीची चर्चा सुरू असल्याने कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील त्याविषयी उत्सुकता आहे. भाजप १०-५ चे सूत्र स्वीकारणार की, सेना आपल्या ताब्यातील जागा भाजपला सोडणार यावरून आकडेवारीचा खेळ मांडला जात आहे.इच्छुकांकडून पक्षावर दबावसन २००९ मध्ये सेना-भाजप एकत्र लढल्यावर सेनेने दहा तर भाजपने पाच जागांवर निवडणूक लढविली होती. सेनेकडून जिल्ह्णाच्या जागावाटपात त्याच फार्म्युल्याचा आग्रह धरला जाण्याची शक्यता असली तरी, प्राप्त परिस्थितीत भाजपची जिल्ह्णात ताकद वाढल्याचे निमित्त करून भाजप पाच जागा घेण्यास तयार होणार काय असा प्रश्न आहे. भाजपने जिल्ह्णातील पंधराही मतदारसंघांत इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली असून, कळवण, नांदगाव, इगतपुरी मतदारसंघ पक्षाला मिळावे यासाठी इच्छुकांकडून पक्षावर दबाव आणला जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा