शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

सिन्नर तालुक्यातील पाच रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 17:57 IST

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील पाच रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. नाशिक जिल्हा परिषदेकडे असलेले ८ मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून, त्यांना जिल्हा मार्ग म्हणून शासनाकडून मान्यता देण्यात आल्याची माहिती आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिली आहे.

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील पाच रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. नाशिक जिल्हा परिषदेकडे असलेले ८ मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून, त्यांना जिल्हा मार्ग म्हणून शासनाकडून मान्यता देण्यात आल्याची माहिती आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिली आहे. याकामी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांची विशेष मदत मिळाल्याचे आमदार वाजे यांनी सांगितले.नाशिक जिल्हा परिषदेकडे असलेले ६ इतर जिल्हा मार्ग व २ग्रामीण मार्ग रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून त्यांना जिल्हा मार्ग म्हणून दि. २६ सप्टेंबर २०१८ रोजी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे. या रस्त्यांवर होणारी वाहतूक, वर्दळ, गावांची संख्या, लोकसंख्या, रस्त्यांचा होणारा वापर यामुळे जिल्हा परिषदेने जिल्हा मार्ग म्हणून वर्ग करण्याचा ठराव केला होता. आमदार राजाभाऊ वाजे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने त्यास शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली आहे. यात १) राष्ट्रीय महामार्ग ५० पासून पास्ते, लोणारवाडी , प्रमुख राज्यमार्ग , ११२ ते कुंदेवाडी , मुसळगाव , खंबाळा ,मºहळ - निºहाळे ते अहमदनगर जिल्हा हद्द - (एकूण ३१.५०० किलोमीटर लांबी), २)डुबेरे पासून पाटोळे, गोंदे, खंबाळा, भोकणी, फर्दापूर, धारणगाव, देवपूर, निमगाव (देवपूर), खडांगळी, मेंढी,सोमठाणे, सांगवी ते इतर जिल्हा मार्ग.(एकूण ४३ किलोमीटर लांबी). ३) सिन्नर, सरदवाडी , पास्ते , जामगाव , विंचूरदळवी ते राज्यमार्ग ३७ ला मिळणारा रस्ता. (एकूण १५ किलोमीटर लांबी). ४) प्रमुख राज्यमार्ग १२ ते सोनांबे, कोनांबे , धोंडबार, औंढेवाडी,आगासखिंड ते प्रमुख राज्य मार्ग १२ ला मिळणारा रस्ता. (एकूण २५.५०० किलोमीटर लांबी).५) राज्य महामार्ग ५० ते नांदूरशिंगोटे,चास, कासारवाडी ते राज्य महामार्ग ३२ ला मिळणारा रस्ता. (एकूण १६.९०० किलोमीटर लांबी).सिन्नर तालुक्यातील एकूण १३३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा मिळालेला असुन यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पात, प्रमुख जिल्हा मार्गांसाठी प्राधान्याने निधीची तरतूद केली जाणार आहे. यामुळे या रस्त्यांची सुधारणा करणे व अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीत या रस्त्यांसाठी निधीची तरतूद करणे सोयीचे होईल. पूर्वी ग्रामीण व्ही.आर व ओ.डी.आर यासाठी निधीची तरतूद कमी असल्याने या रस्त्यांना निधी उपलब्ध होताना अडचणी येत होत्या. हे रस्ते नेहमी वर्दळीचे असल्याने, खरे तर १० ते १५ वर्षापूर्वीच ह्या रस्त्यांची दर्जोन्नती होणे गरजेचे होते. परंतु याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले होते. आमदार राजाभाऊ वाजे यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला व जिल्ह्यात प्रामुख्याने सिन्नर तालुक्यातील जास्त रस्त्यांना दर्जोन्नती मिळालेली आहे. त्यामुळे सदरील रस्त्यावरील गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा