शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

जिल्हावासीयांनी साधला अनोखा ‘योग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 23:57 IST

नाशिक : आंतरराष्टÑीय योग दिनानिमित्त जिल्हावासीयांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून अनोखा योग साधला. विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांसह अनेकांनी घरातूनच योगाची डिजिटल माध्यमांच्या सहाय्याने योगासने, प्राणायम केले. तर योग गुरुंनी योगाचे महत्त्व सांगत निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी योग किती महत्त्वाचे आहेत हे पटवून दिले.

ठळक मुद्देआंतरराष्टÑीय योगा दिन : सामाजिक, शैक्षणिक संस्थांसह घरोघरी योगाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आंतरराष्टÑीय योग दिनानिमित्त जिल्हावासीयांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून अनोखा योग साधला. विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांसह अनेकांनी घरातूनच योगाची डिजिटल माध्यमांच्या सहाय्याने योगासने, प्राणायम केले. तर योग गुरुंनी योगाचे महत्त्व सांगत निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी योग किती महत्त्वाचे आहेत हे पटवून दिले.आत्मा मालिक विद्यालययेवला : तालुक्यातील पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरु कुल व ज्युनियर कॉलेजच्या वतीने कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता रविवारी, सार्वजनिक गर्दी टाळून डिजिटल प्लॅटफॉर्मच्या आधारावर तसेच ‘योगा अ‍ॅट होम, योगा विथ फॅमिली’या संकल्पनेवर आधारीत योग दिन साजरा करण्यात आला. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, कोकमठाण यांच्या संकल्पनेतून झूम अँपच्या साहाय्याने गुरु कुलातील विद्यार्थ्यांना विविध योगासनांच्या प्रात्यिक्षकांचे सादरीकरण पहावयास मिळाले. गुरु कुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांनी कोरोनावर मात करण्यासाठी योगासने करणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले.बाभुळगाव येथे योगाभ्यासाचे धडेयेवला : तालुक्यातील बाभुळगाव येथे पतंजली योगपीठ वर्गाच्यावतीने योगा अभ्यास करण्यात आला. बाभुळगाव येथील बाजीराव सोनवणे यांनी २०१२ साली मोफत योग वर्ग सुरू केला. २०१६ मध्ये सोनवणे यांची बदली झाल्याने त्यांच्याकडूनच योगाचे धडे घेतलेल्या भागवत जाधव यांनी या युवावर्गाची धुरा स्वीकारली आणि हरिद्वार येथे पतंजली योगपीठ जाऊन योगाचे शास्त्रीय धडे घेतले. पतंजली योगपीठ सुरू केले. धानोरा येथील ऋतुजा घुले व प्रेरणा चव्हाण तसेच बाभुळगाव येथील सहभागी व्यक्तींना आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या सहयोगाने ििडजटल प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती महेश शेटे यांनी दिली. योगाभ्यासासाठी येवला तहसील प्रभारी भागवत जाधव, उत्तम घुले, शिवाजी शिरसाठ, विकास सातारकर, मोठा भाऊ शिरसाठ, सुरेश थोरात, रवींद्र चव्हाण, सर्वेश चव्हाण, साक्षी चव्हाण उपस्थित होते.मालेगावी योग दिवसमालेगाव : क्रीडा भारती मालेगाव संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस योगप्रेमींनी घरी राहून योग दिवस साजरा केला. क्रीडा भारती यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये योगाविषयी आवड निर्माण व्हावी, त्याचप्रमाणे पारंपारिक योगाचा प्रसार व्हावा यासाठी दरवर्षी सामूहिक योग कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याला नागरिकांनी प्रतिसाद देत उत्साहात योग दिवस साजरा केला. यात क्रीडा भारतीचे प्रांत उपाध्यक्ष नितीन पोफळे, जिल्हाध्यक्ष भानु कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. जिल्हामंत्री गितेश बाविस्कर यांनी संचालन केले. योग दिवस यशस्वी करण्यासाठी मालेगाव शहर अध्यक्ष भाग्येश कासार, शहरमंत्री चेतन बाविस्कर, दादा बहिरम, देवेंद्र अलई, अभिजीत जाधव, चेतन वाघ, नरेश शेलार, दीपक पाटील, हरीश ब्राम्हणकर, कपिल डांगचे, सुनील अहिरे यांनी परिश्रम घेतले. नितीन पोफळे, भानू कुलकर्णी, गितेश बाविस्कर, भाग्येश कासार, चेतन बाविस्कर यांनी आभार मानले.एचएएलच्या विद्यार्थ्यांचा योगा फ्राँम होमओझरटाऊनशिप : येथील एच.ए.एल. हायस्कुल इंग्रजी माध्यम शाळेच्या एन.सी.सी. विद्यार्थ्यांनी दि. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन हा घरीच आपल्या कुटुंबासमवेत साजरा केला. राज्यात आणि देशात कोरोना विषाणू च्या प्रसारामुळे शाळा महाविद्यालये बंद असल्या कारणाने शाळेतील विदयार्थी व एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरी कुटुंबा समवेत योगासने करीत योगदिन साजरा केला एन.सी. सी. च्या विद्यर्थ्यांनी एन. सी. सी. ने दिलेल्या मार्गदर्शक नियमानुसार. सकाळी योगाचे विविध प्रकार आपल्या घरी कुटुंबासमवेत केले. यावेळी डी.डी.नॅशनल, डी. डी. भारती चॅनलवर योग कार्यक्र म व तसेच युट्युब चॅनल्स वर विविध योग व्हििडओच्या लिंक्स प्रसारित केलेल्या होत्या. प्राचार्य के. एन. पाटील यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाच्या सुभेच्छा दिल्या. उपक्र म यशस्वी करण्यासाठी एनसीसी अधिकारी प्रतिभा सोनवणे सचिन हरिश्चंद्रे, बी.जी पाटील आण ि राजेंद्र शेळके यांनी परिश्रम घेतले.अंकाई किल्ल्यावर वृक्षारोपणमनमाड : जागतिक योग दिनानिमित्त, अंकाई किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी येणार्या ट्रेकर्स व वृक्षप्रेमी तरु णांनी महंत ज्ञानेश्वर माउली यांच्या नेतृत्वाखाली योगासने केली. यानंतर किल्यावर वड, बेल, चिंच यासह आयुर्वेदिक वृक्षांची लागवड केली. महंत ज्ञानेश्वर माउली यांनी योगा करण्याचे फायदे सांगितले. तर औषधी वनस्पतीची सर्वांनाच गरज भासते, त्यामुळे आपण राहतो त्या परिसरात जास्ती जास्त झाडांची लागवड करण्याचे आवाहन केले. यावेळी बाळू गोसावी, सुनील पवार, भिला वडगर, शंकर अंजनवाड, संदीप वणवे, मुदसर शेख, सचिन रानडे, दत्तू शिंदे, स्वराज करकाळे, शिवा पाटील, प्रवीण वडगर, प्रदीप गायकवाड, महेंद्र बोरसे, लक्ष्मीकांत दरवडे आदी उपस्थित होते.सटाण्यात पालिकेतर्फेयोगकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजनसटाणा : शहरातील मध्यवर्ती पाठक मैदान परिसरात नगर परिषदेकडून होत असलेल्या योगा सेंटरच्या कामाचे रविवारी (दि.२१) आंतरराष्ट्रीय योगादिनाच्या मुहूर्तावर नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. उपनगराध्यक्षा सोनाली बैताडे व सामाजिक कार्यकर्ते दत्तू बैताडे या दाम्पत्याच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. या योगासेंटरमुळे शहरवासीयांच्या आरोग्यासाठी योगदान मिळतानाच शहरलौकिकातही भर पडेल. या योगा केंद्राचा लाभ शहरातील सर्व घटकांना होईल. अद्ययावत प्रशस्त व विविध सेवासुविधांनी सज्ज असलेल्या केंद्रात प्रशिक्षित अनुभवी योगा शिक्षक कायमस्वरूपी नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच तज्ञ मान्यवरांचीही वेळोवेळी मार्गदर्शन,प्रशिक्षण आयोजित केले जाईल असेही नगराध्यक्ष मोरे यांनी सांगितले. याप्रसंगी उपनगराध्यक्षा सोनाली दत्तू बैताडे,सभापती राहुल पाटील,संगीता देवरे, नगरसेविका निर्मला भदाणे,रु पाली सोनवणे, डॉ. विद्या सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते दत्तु बैताडे, जगदीश बैताडे, योगेश पाटिल, आकाश सांगळे, अविनाश सांगळे, सुनिल अहिरे,नाना सोनवणे, योगा शिक्षक योगेश चव्हाण, चेतन बागुल, नंदिकशोर शेवाळे, निलेश भामरे, पार्थ सोनवणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्यYogaयोग