शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला मिळाले पंधराव्या वित्त आयोगाचे 82 कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 01:13 IST

पंधराव्या वित्त आयोगाच्या तिसऱ्या टप्प्यातील ८२ कोटीचा हप्ता पुन्हा जिल्हा परिषदेला प्राप्त झाला असून, निधी खर्चाबाबत यापूर्वी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हा निधी खर्च करण्याच्या सूचना शासनस्तरावरून प्राप्त झाल्याने गेल्या सहा ते सात महिन्यांपासून पडून असलेला निधी खर्च करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देनिधी खर्चाचा मार्ग मोकळा : प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

नाशिक : पंधराव्या वित्त आयोगाच्या तिसऱ्या टप्प्यातील ८२ कोटीचा हप्ता पुन्हा जिल्हा परिषदेला प्राप्त झाला असून, निधी खर्चाबाबत यापूर्वी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हा निधी खर्च करण्याच्या सूचना शासनस्तरावरून प्राप्त झाल्याने गेल्या सहा ते सात महिन्यांपासून पडून असलेला निधी खर्च करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत या विषयावर चर्चा करण्यात आली. पंधराव्या वित्त आयोगाने यापूर्वीही दोन हप्त्यात नाशिक जिल्ह्याला सुमारे १६० कोटी रुपये दिले असून, आता नव्याने आणखी तिसऱ्या हप्त्याचे ८२ कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी सभेत दिली. यापूर्वी पंधराव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना एकूण प्राप्त रकमेतून प्रत्येकी दहा दहा टक्के रक्कम देण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यातून जिल्हा परिषदेकडे १६ कोटी रूपये तर पंचायत समित्यांकडे १६ कोटी रुपये विना खर्च पडून होते. त्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वाची प्रतीक्षा होती. आता पुन्हा ८२ कोटी रुपयांमधून जिल्हा परिषदेला ८ कोटी रूपये अतिरिक्त मिळाले असून, एकूण २४ कोटी रुपये ग्रामपंचायतींच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार खर्च करण्यास शासनाने मुभा दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. तर सदस्यांनी या निधीसाठी आपले प्रस्ताव येत्या एका आठवड्यात द्यावेत असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले. कोविडचा निधी नॉनकोविडसाठीकोरोना प्रतिबंधासाठी शासनाने सात कोटी रुपये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दिले होते. त्यातील साडेचार कोटीतून औषधे व इतर साहित्य खरेदी करण्यात आले. उर्वरित अडीच कोटी रुपये पडून असल्याने हा निधी नॉनकोविडसाठी आरोग्य विभागाला वापरण्यासाठी मिळावा असा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला  आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कोविड केअर सेंटर व कोविड हॉस्पिटलमध्ये पुरविण्यात आलेले साहित्य जमा करून ते जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये वापरण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकMONEYपैसा