शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात मका खरेदी केंद्रांचा मुहूर्त टळणार

By श्याम बागुल | Updated: October 31, 2018 14:43 IST

सन २०१८ च्या हंगामातील मक्यासाठी सरकारने १७०० रूपये प्रति क्विंटल दर निश्चित केला असून, गेल्या वर्षापेक्षा २७५ रूपये दर वाढवून दिला असल्यामुळे शेतक-यांना त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, गेल्या वर्षी सर्वदूर समाधानकारक

ठळक मुद्देदहा केंद्राना मान्यता : मका शेतातच पडूनअद्यापही काही केंद्रांवर सोयाबीन, मूग, उडीद खरेदी केंद्रे सुरू

नाशिक : खुल्या बाजारात शेतकऱ्यांची व्यापाºयांकडून होणारी लुबाडणूक टाळण्यासाठी यंदाही सरकारने हमीभावाने मका खरेदी केंद्रे १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी, यंदा पावसाच्या हुलकावणीमुळे उशिराने झालेल्या पेरणीमुळे शेतकºयांच्या मक्याचे कणिस अजुनही शेतात पडून असल्यामुळे तालुका खरेदी-विक्री केंद्रामार्फत मका खरेदीचा मुहूर्त टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सन २०१८ च्या हंगामातील मक्यासाठी सरकारने १७०० रूपये प्रति क्विंटल दर निश्चित केला असून, गेल्या वर्षापेक्षा २७५ रूपये दर वाढवून दिला असल्यामुळे शेतकºयांना त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, गेल्या वर्षी सर्वदूर समाधानकारक पडलेल्या पावसामुळे सरकारने मार्केट फेडरेशनच्या माध्यमातून मका खरेदी केंद्रे सुरू केली होती. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाल्याने नाशिक जिल्ह्यात अवघ्या दोन महिन्यात ९६,६३३ क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आली. तरि देखील जवळपास दिड हजाराहून अधिक शेतकºयांना या विक्रीपासून वंचित राहावे लागले होते. यंदा सरकारने मक्याचा हमीभाव वाढवून देत १ नोव्हेंबरपासून खरेदी-विक्री केंद्रांवर शेतकºयांनी सातबारा उताºयासह नोंदणी करून आपला मका विक्रीसाठी नेण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यासाठी दहा खरेदी केंद्रे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तालुक्याच्या तहसिलदारांनी खरेदी केलेला मका साठवणुकीसाठी खरेदी विक्री संघाला गुदाम उपलब्ध करून देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार येवला, लासलगाव, निफाड, देवळा, सटाणा, नांदगाव, मालेगारव, चांदवड, सिन्नर व नामपूर या दहा ठिकाणी खरेदी-विक्री संघांना पत्र देवून मार्केट फेडरेशनने १ नोव्हेंबर पासून मक्याची नोंदणी व खरेदी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी बुधवारी मार्केट फेडरेशनने आढावा घेवून तशा सुचना दिल्या परंतु अद्यापही काही केंद्रांवर सोयाबीन, मूग, उडीद खरेदी केंद्रे सुरू असल्यामुळे खरेदी-विक्री संघांनी तुर्त मका खरेदी करण्यास अनुत्सूकता दर्शविली आहे. तथापि, यंदा मक्याच्या उत्पादनात पावसाच्या वक्रदृष्टीने मोठी घट झाली असून, त्यातही उशिराने पेरणी झाल्यामुळे अजुनही काही शेतक-यांचा मका शेतात उभा आहे तर काहींनी तो काढून खळ्यावर तसाच ठेवला आहे. त्यामुळे मुहूर्तावर मक्याची खरेदी जवळपास अशक्य असल्याचे फेडरेशनच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक