नाशिक : राज्यभरातील मोठ्या शासकीय रुग्णालयांमध्ये गणना असलेल्या जिल्हा रुग्णालयाची वाटचाल सद्यस्थितीत मदिरालयाकडे झाल्याचे चित्र दिसून येत आहे़ रुग्णालयात कर्तव्यावर असलेले वर्ग चारचे काही कर्मचारी हे मद्यधुंद अवस्थेत काम करीत असल्याची ओरड स्टाफ नर्सकडून केली जात आहे़ वर्ग चारसाठी रुग्णालय प्रशासनाने दिलेले लॉकर हे वस्तू ठेवण्यासाठी नव्हे तर मद्याच्या रिचवलेल्या बाटल्या ठेवण्यासाठी दिलेत की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच स्वच्छता निरीक्षकांना हा सर्व प्रकार माहीत असूनही याकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली जात असल्याचे चित्र आहे़ नाशिक जिल्हाच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील सर्वसामान्य तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या नागरिकांसाठी जिल्हा रुग्णालय हा एकमेव आधार आहे़आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा रुग्णालय हा एकमेव पर्याय शिल्लक असतो़ मात्र, याठिकाणी कामावर असलेले वर्ग चारचे काही कर्मचारी हे मद्यप्राशन करून कर्तव्यावर असतात़ विशेषत: रात्रपाळी करणाऱ्या कर्मचाºयांबाबत विचारायलाच नको अशी परिस्थिती आहे़ मेल सर्जिकल, मेल आर्थो, जळीत कक्ष, अपघात विभाग, इमर्जन्सी वार्ड, मनोरुग्ण विभाग, इन्फेक्शन वार्ड, ब्लड बँक या विभागांतील वर्ग चारचे काही कर्मचारी हे रात्रीच्या वेळी बिनदिक्कतपणे मद्यप्राशन करून कर्तव्यावर असतात़, तर मद्यप्राशनासाठी वर्ग चारच्या कर्मचाºयांना काही लॅब टेक्निशियन व डॉक्टरांचीही कंपनी मिळत असल्याची चर्चा आहे़स्वच्छता निरीक्षकांची मवाळ भूमिकाजिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या कर्मचाºयांवर लक्ष ठेवण्यासाठी तीन कायमस्वरूपी, तर दोन कंत्राटी स्वच्छता निरीक्षक आहेत़ याबरोबरच कंत्राटी कर्मचाºयांवर लक्ष ठेवण्यासाठी तीन मुकादम व एक ओटी असिस्टंटही आहे़ मात्र, असे असूनही जिल्हा रुग्णालयाच्या स्वच्छतेबाबत नागरिकांची ओरड कायम आहे़, तर दुसरीकडे मद्यपान करून कर्तव्य करणाºयांविरोधात कारवाई केली जात नसल्याने ते निर्ढावले आहेत़ जिल्हा रुग्णालयाच्या सर्व विभागांतील मद्यपान करणाºयांचे लॉकर तपासून साफसफाई मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे़
जिल्हा रुग्णालय की मदिरालय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:15 IST