शहरं
Join us  
Trending Stories
1
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना सूचना
2
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
3
KL Rahul Century : स्टायलिश बॅटर केएल राहुलची क्लास सेंच्युरी! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
4
US-इराण लढाईत पाकिस्तान अडकला, ३ संकटांनी घेरलं; असीम मुनीर यांनी बोलावली तातडीची बैठक
5
धुळ्यात हजारो मतदान कार्डांचा साठा सापडला; एमआयएमचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
6
...म्हणून राज ठाकरेंनी माझ्यावर टीका करणं टाळलं असावं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का बोलले?
7
बाजारात घसरण होऊनही गुंतवणूकदारांनी ३२ हजार कोटी कमावले; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
अमेरिका-इराण युद्धासाठी इस्रायल सतर्क, आयर्न डोम सक्रिय; आणखी एक युद्ध सुरू होणार?
9
अयोध्येतील श्रीराम मंदिर अन् कुतुब मिनारपेक्षा उंच! बिहारमध्ये उभारले जातेय विराट रामायण मंदिर
10
Makar Sankranti 2026: मकर संक्रांत ते रथसप्तमी; हळदी-कुंकवासाठी हाच काळ का निवडला जातो?
11
IND vs NZ : कोण आहे Kristian Clarke? ज्यानं 'रो-को'ला रोखून दाखवत राजकोटचं मैदान गाजवलं
12
शीख मुलीला पाकिस्तान्यांनी उचलून नेले, ६ जणांनी अनेक दिवसांपर्यंत सामूहिक बलात्कार केला
13
मुंबईत पकडलेल्या त्या दोन बांगलादेशींना मायदेशी पाठवलं, आता पुन्हा कफ परेडमध्ये सापडल्या...
14
हृदयद्रावक! "बेटा, मी येतोय...", वडिलांचा लेकीला शेवटचा कॉल; पतंगाच्या मांजामुळे गमावला जीव
15
गुंतवणूकदारांची दिवाळी! RBI च्या निर्णयामुळे गुंतवणूकदार मालामाल; ५ वर्षांत पैसा झाला ३ पट!
16
ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
17
मृत्यूची झडप! महाकाय क्रेन भरधाव 'रेल्वे गाडी'वर वर कोसळलं; २८ प्रवाशांचा मृत्यू, कसा घडला अपघात?
18
Syeda Falak: "एक दिवस ही हिजाब घातलेली मुस्लीम महिला…" फडणवीसांना चॅलेंज देणारी सईदा फलक आहे तरी कोण?
19
गुंतवणूकदारांची संक्रांत! निफ्टी ५०० मधील ७०% शेअर्स तोट्यात; ५ वर्षांतील सर्वात खराब सुरुवात
20
एकाच ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग, प्रॉडक्शन अन् डिझाइनिंग; Apple ने लॉन्च केला Creator Studio
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात होणार जिल्हा परिषदेची नवीन इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:38 IST

नाशिक जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा विस्तार पाहता, सध्याची इमारत प्रशासकीय कामकाजासाठी अपुरी पडत असल्याची बाब हेरून विद्यमान पदाधिकारी व सदस्यांनी डिसेंबर २०१७ मध्ये ठराव करून नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यात असलेल्या जागेवर नवीन अद्ययावत प्रशासकीय इमारत बांधण्याचा निर्णय घेतला होता.

नाशिक जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा विस्तार पाहता, सध्याची इमारत प्रशासकीय कामकाजासाठी अपुरी पडत असल्याची बाब हेरून विद्यमान पदाधिकारी व सदस्यांनी डिसेंबर २०१७ मध्ये ठराव करून नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यात असलेल्या जागेवर नवीन अद्ययावत प्रशासकीय इमारत बांधण्याचा निर्णय घेतला होता. सुमारे ४६ कोटी रुपये खर्चाच्या या इमारतीसाठी पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यात असलेली ही जागा जिल्हा परिषदेच्या ताब्यात घेण्यात आली. त्याचबरोबर संपूर्ण वर्षभर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, सदस्य तसेच अधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून नवीन इमारत बांधकामास शासनाची अनुमती मिळविली. त्याचबरोबर निधीही मिळविला. या नवीन इमारतीत तळमजला व त्यावर सहा मजले असणार असून, पहिला मजला हा वाहन पार्किंगसाठी असणार आहे. संपूर्ण ग्रीन बिल्डिंगची संकल्पना असून, नैसर्गिक वायुविजन, पाण्याच्या व ऊर्जेच्या वापरात काटकसर, पर्जन्य जलपुनर्भरणा, जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बांधकाम साहित्याचा वापर यात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दिव्यांगांना सोयीसुविधा, लिफ्टची सोय व अग्निशामक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सरत्या वर्षात या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले असून, येत्या वर्षभरात सदरची इमारत उभी राहणार असल्याचा संकल्प जिल्हा परिषदेने सोडला आहे. इमारत उभारण्यासाठी जिल्हा परिषदेचा २५ टक्के सहभाग असून, त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने निधीची तरतूद केली आहे.मालेगावला ‘उर्दू घर’ इमारत सज्जमालेगाव मध्य शहरातील उर्दू भाषिकांची लक्षणीय संख्या असल्याने उर्दूसाठी आवश्यक सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देत राज्याच्या अल्पसंख्याक विभागाने सुमारे आठ कोटी रुपये खर्चून शहरात भव्य अशी ‘उर्दू घर’ इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांपासून ते साहित्यिकांपर्यंत व वाचनालयात स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक अभ्यासिका, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आॅटोटोरियम अशा विविध उपयुक्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उर्दू घराची निर्मिती करण्यात आली. शहरातील मध्यवर्ती भागातील सर्व्हे क्रमांक १६९ येथील उर्दू शाळा क्रमांक ६४ च्या आवारात सुमारे २० हजार चौरस फुटात भव्य इमारत बांधण्यासाठी प्रस्ताव सन २०१५ मध्ये सादर करण्यात आला. त्यास २१ मे २०१५ रोजी राज्याच्या अल्पसंख्याक विभागाने मंजुरी दिली. प्रथम सुमारे चार कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाºया इमारतीमध्ये मुख्य इमारत सभागृह, प्रदर्शनी केंद्र, अभ्यासिका, वाचनालय, स्वच्छता व पाणीपुरवठा, विद्युतीकरण अंतर्गत रस्ते, सौर ऊर्जा प्रणाली, फर्निचर, इंटेरिअर व संरक्षक भिंत इत्यादी कामांचा समावेश होता. त्यामुळे एकतर महाराष्टÑातील उर्दूसाठी उभारण्यात आलेली भव्य अशी एकमेव इमारत ठरावी. सदर इमारतीच्या कामास प्रत्यक्ष आॅगस्ट २०१६ मध्ये प्रारंभ झाला. हा प्रकल्प पूर्णत्वासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींही शासन दरबारी सतत पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणून इमारतीचे प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते, आॅडोटोरियम, ग्रंथालयाकरिता आवश्यक फर्निचर अशा विविध कामांसाठी २३ आॅगस्ट २०१८ रोजी तीन कोटी ८४ लाख १५ हजार ९६६ रुपयांच्या वाढीव प्रस्तावास मंजुरी दिली. त्यामुळे सदर इमारतीचे काम प्रगतिपथावरून पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यास उपयोग झाला. आज इमारतीची अंतर्गत व बाह्य कामे पूर्ण झाली आहेत. सध्या वाहनतळाचे काम सुरू असून, इमारतीच्या समोरील रस्त्यावर १२ झोपडीधारकांनी अतिक्रमण केलेले आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने संरक्षक भिंतीचे काम रखडलेले आहेत.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदNew Yearनववर्ष