जिल्हा बँकेने थकीत कर्ज वसुली थांबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 06:32 PM2018-08-21T18:32:26+5:302018-08-21T18:32:34+5:30

गेल्या दोन वर्षांपासून असलेली भीषण दुष्काळी परिस्थिती, अशातच शेतमालाचे पडलेले भाव यामुळे अगोदरच शेतकरी पिचलेला, वैतागलेला असताना ऐन हंगामात जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकºयांना थकीत कर्ज वसुलीसाठी सहकार खात्यामार्फत कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. बँकेने सक्तीची कर्ज वसुली थांबवावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली असून, शेतकरी संघटनेने ही कर्ज वसुलीची प्रक्रि या त्वरित थांबवावी, अशा मागणीचे निवेदन सहायक निबंधक यांना दिले आहे.

 The District Bank should stop the debt relief due to exhaustion | जिल्हा बँकेने थकीत कर्ज वसुली थांबवावी

जिल्हा बँकेने थकीत कर्ज वसुली थांबवावी

Next
ठळक मुद्देयेवला तालुक्यातील शेतकऱ्यांची सहायक निबंधकांकडे मागणी

येवला : गेल्या दोन वर्षांपासून असलेली भीषण दुष्काळी परिस्थिती, अशातच शेतमालाचे पडलेले भाव यामुळे अगोदरच शेतकरी पिचलेला, वैतागलेला असताना ऐन हंगामात जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकºयांना थकीत कर्ज वसुलीसाठी सहकार खात्यामार्फत कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. बँकेने सक्तीची कर्ज वसुली थांबवावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली असून, शेतकरी संघटनेने ही कर्ज वसुलीची प्रक्रि या त्वरित थांबवावी, अशा मागणीचे निवेदन सहायक निबंधक यांना दिले आहे.
सध्या खरीप हंगामावर पावसाच्या अवकृपेमुळे संकटाचे सावट असताना जिल्हा बँकेने तालुक्यातील शेतकºयांना थकीत पीककर्ज वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. सहायक निबंधकांमार्फत या नोटीस शेतकºयांना चालू महिन्यात प्राप्त झालेल्या आहेत. एकीकडे जिल्हा बँकेने शेतकºयांना नोटाबंदीनंतर पीककर्जाचे वाटप केले नाही, तर दुसरीकडे शेतकरी कौटुंबिक समस्यांना तोंड देत दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींनाही सामोरे जात आहे. जिल्हा बँकेने सहकारी साखर कारखाना, संचालकांच्या विविध सहकारी संस्थांना मनमानी कर्जाचे वाटप करून आज ही कर्जे थकीत असताना त्या कर्जाची वसुली सोडून शेतकºयांच्या मागे बँक हात धुवून थकीत कर्ज वसुलीसाठी लागली आहे. सदरच्या वाटलेल्या कर्जामुळेच जिल्हा बँक आज डबघाईस आलेली आहे, हे सत्य नाकारून चालणार नाही. महाराष्ट्रात अनेक शेतकºयांनी थकीत कर्जापोटी आत्महत्या केलेल्या असताना जिल्हा बँकेने शेतकºयांना नोटिसा पाठविण्यापूर्वी विचार करावयास हवा होता, असेही शेतकरी संघटनेने सहायक निबंधकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सध्या खरीप हंगामात अनेक ठिकाणी शेतकºयांना पावसाअभावी दुबार पेरण्या कराव्या लागल्या आहेत, शेतकरी संकटात असताना कर्जदार सभासदांना सक्तीची कर्ज वसुली राबवून त्यास जप्तीची, लिलावाची भीती दाखवून त्रास दिला जात आहे.शेतकºयांनी घेतलेल्या पीककर्जाचा यापूर्वीही वेळेवर भरणा केलेला आहे; मात्र सलगच्या दुष्काळामुळे तसेच शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी पीककर्ज भरू शकलेला नाही हे बँकेने लक्षात घेऊन सक्तीची कर्ज वसुली थांबवावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतु पाटील झांबरे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख संध्या पगारे, सुभाष सोनवणे, अनिस पटेल, अरु ण जाधव, शिवाजी वाघ, सुरेश जेजुरकर, सुरेश कदम, बापूसाहेब पगारे आदींनी केली आहे.

Web Title:  The District Bank should stop the debt relief due to exhaustion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.