शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँक अध्यक्ष  दराडे यांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:42 IST

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी अडीच वर्षांनंतर अखेर जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडे सादर केला आहे. जिल्हा बॅँकेत अध्यक्ष नरेंद्र दराडे व उपाध्यक्ष सुहास कांदे हे दोन्हीही सेनेचे पदाधिकारी आहेत. सेनेवर सातत्याने कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपाला या निमित्ताने सहकार क्षेत्रात प्रभाव निर्माण ...

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी अडीच वर्षांनंतर अखेर जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडे सादर केला आहे. जिल्हा बॅँकेत अध्यक्ष नरेंद्र दराडे व उपाध्यक्ष सुहास कांदे हे दोन्हीही सेनेचे पदाधिकारी आहेत. सेनेवर सातत्याने कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपाला या निमित्ताने सहकार क्षेत्रात प्रभाव निर्माण करण्याची संधी मिळाली आहे.  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक एप्रिल २०१५ मध्ये झाली होती. त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक जून २०१५ मध्ये झाली. त्यावेळी ही निवड वर्षभरासाठीच असल्याचे संचालक मंडळाच्या काही सदस्यांचे म्हणणे होते. मात्र सातत्याने आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हा बॅँकेची अवस्था ८ नोव्हेंबर २०१६ च्या नोटबंदीच्या निर्णयानंतर अत्यंत अवघड झाली होती. त्यामुळे अध्यक्ष होण्यासाठी फारसे कोेणी उत्सुक नव्हते. दरम्यानच्या काळात वर्षभरासाठी असलेली निवड वर्ष दीड वर्ष उलटूनही विद्यमान पदाधिकारी राजीनामा देत नसल्याने शहराच्या मध्यवस्तीतील एका हॉटेलात डझनभर संचालकांची बैठक होऊन त्यात विद्यमान पदाधिकाºयांवर अविश्वास ठराव आणण्याची खेळी खेळण्यात आली होती. मात्र त्यावेळी हा प्रयोग काही संचालकांच्या विरोधामुळे फसला होता. नोटबंदीच्या आर्थिक टंचाईतून बाहेर काढण्यासाठी जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह काही संचालकांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन जिल्हा बॅँकेला आवश्यक ती मदत करण्याचे साकडे घातले होते. बदल्यात नरेंद्र दराडे यांनी त्यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे राजीनामा दिल्याची चर्चा होती. मागील आठवड्यात नरेंद्र दराडे यांच्या कुटुंबातील एका विवाह सोहळ्यामुळे अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांनी थांबविला होता. मात्र हा सोहळा पार पडताच त्यांनी मंगळवारी (दि.२८) जिल्हा बॅँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल यांच्याकडे राजीनामा दिल्याचे व बकाल यांनी हा राजीनामा मंजुरीसाठी विभागीय सहनिबंधकांकडे पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत भाजपाचे सहा संचालक होते. त्यातील दोघांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता जिल्हा बॅँकेत खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, माजी आमदार माणिकराव कोकाटे व केदा अहेर असे चार संचालक आहेत. त्यामुळे जिल्हा बॅँक अध्यक्षपदावर आता भाजपा दावा सांगण्याच्या तयारीत आहे.

टॅग्स :bankबँकNashikनाशिक