शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

जिल्हा बँकेला  २१ कोटींचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 1:28 AM

दीड वर्षापूर्वी करण्यात आलेल्या देशपातळीवरील नोटाबंदीमुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला बसणाऱ्या २१ कोटी रुपयांच्या फटक्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.

नाशिक : दीड वर्षापूर्वी करण्यात आलेल्या देशपातळीवरील नोटाबंदीमुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला बसणाऱ्या २१ कोटी रुपयांच्या फटक्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.  यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होऊन २१ कोटी रुपये बॅँकेने तोट्यात दाखवून नुकसान सोसावे या रिझर्व्ह बॅँकेच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी चलनातून हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बाद करण्याची घोषणा केली होती.  ज्यांच्याकडे हजार व पाचशेच्या नोटा आहेत, त्यांना त्या बदलून देण्यासाठी डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांनी आपल्याकडील हजार व पाचशेच्या नोटा मुदतीत अधिकाधिक चलनात आणून त्या बदलण्यासाठी विविध क्लृप्त्या लढविल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा बॅँकेच्या कर्जदारांनीही हजार व पाचशेच्या नोटा बॅँकेत जमा करून आपल्यावरील कर्जफेड केली होती. रिझर्व्ह बॅँकेने तब्बल दहा महिन्यांनंतर जिल्हा बॅँकेच्या ताब्यातील नोटा स्वीकारल्या.  नाशिक जिल्हा बॅँकेकडे अशा प्रकारे ३४१ कोटी रुपये जमा झाले होते.  दहा महिन्यांच्या व्याजापोटीची रक्कम मिळावी यासाठी जिल्हा बॅँकेने आजवर रिझर्व्ह बॅँकेला १५५ पत्रे पाठविली, मात्र त्याची साधी दखलही घेण्यात आली नसल्याचे बॅँकेचे म्हणणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला रात्री आठ वाजता नोटाबंदीची घोषणा केली त्यावेळी बॅँकेचे व्यवहार बंद झाले होते. त्यादिवशी बॅँकांकडे त्या दिवसाच्या आर्थिक व्यवहाराची रक्कम तशीच पडून होती. आता रिझर्व्ह बॅँकेने नोटाबंदीच्या दिवशी झालेल्या व्यवहारातील हजार व पाचशे रुपयांच्या नोटांची जबाबदारी घेण्यास नकार दिला होता. उलट सदरची रक्कम बॅँकेच्या तोट्यात दाखवावी असा सल्लाही दिला होता. नाशिक जिल्हा बॅँकेप्रमाणे राज्यातील आठ जिल्हा बॅँकांबाबत हा प्रकार घडल्याने यासंदर्भात सर्व बॅँकांनी एकत्र येत सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली. त्याची सुनावणी होऊन नोटाबंदीची रक्कम बॅँकेच्या तोट्यात दाखविण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.जिल्हा बॅँकेकडून निर्णयाचे स्वागतसर्वाेच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे साहजिकच जिल्हा बॅँकेचा तोटा आता २१ कोटी रुपयांनी कमी होणार आहे. यासंदर्भात बुधवारी बॅँकेच्या कार्यकारी मंडळाची बैठक होेऊन त्यात या विषयावर चर्चा करण्यात आली. २१ कोटी रुपये तोट्यात दाखविण्याचा सल्ला नाबार्डने रिझर्व्ह बॅँकेच्या हवाल्याने दिला होता. आता न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे आज ना उद्या ही रक्कम बॅँकेला मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या बैठकीत बॅँकेच्या मार्चअखेर वसुलीचा आढावाही घेण्यात आला. कर्जदार शेतकºयांनी वन टाइम सेटलमेंटचा आधार घेऊन कर्जाची परतफेड करावी, असे आवाहन अध्यक्ष केदा अहेर यांनी केले आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रNote Banनोटाबंदी