जिल्हा बॅँक : योजनेपासून वंचित राहण्याची भीती कर्जमाफीसाठी ४७ हजार शेतकºयांची माहिती जुळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 01:10 AM2018-03-11T01:10:30+5:302018-03-11T01:10:30+5:30
नाशिक : आॅनलाइन भरलेल्या माहितीचा ताळमेळ बसत नसल्याने ४७ हजार शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात असून, जिल्हा बॅँकेने या संदर्भात केलेल्या आवाहनाला फक्त तीन हजार शेतकºयांचा प्रतिसाद मिळाला आहे.
नाशिक : जिल्हा बॅँकेकडून पीककर्ज घेताना खातेदाराने बॅँकेला दिलेली माहिती व शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत आॅनलाइन भरलेल्या माहितीचा ताळमेळ बसत नसल्याने जिल्ह्णातील जवळपास ४७ हजार शेतकरी शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात असून, जिल्हा बॅँकेने या संदर्भात केलेल्या आवाहनाला फक्त तीन हजार शेतकºयांचा प्रतिसाद मिळाला आहे.
राज्य सरकारने जुलै महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान कर्जमाफी योजना जाहीर करून आॅगस्ट महिन्यापासून शेतकºयांकडून आॅनलाइन कर्जमाफीचे अर्ज भरून घेतले. या अर्जात जवळपास ५५ प्रकारचे प्रश्न विचारून शेतकºयाची व त्याच्या कुटुंबीयांची इत्यंभुत माहिती शासनाने भरून घेतली व त्याची खात्री पटल्यानंतरच त्यांचे दीड लाखापर्यंतचे कर्जमाफ केले. प्रत्यक्षात शेतकºयाच्या हातात कर्जमाफीची रक्कम न देता जिल्हा बॅँकेच्या त्याच्या कर्जखात्यााात पैसे भरून सातबारा कोरा करण्याचा प्रयत्न केला.
जवळपास ५०,३३३ शेतकºयांना शासनाने अपात्र ठरवून त्यांची यादी पुन्हा जिल्हा बॅँकेकडे जानेवारी महिन्यात परत पाठविली व शेतकºयांनी भरलेली चुकीच्या माहितीची दुरुस्ती करून पुन्हा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या. त्यात प्रामुख्याने कर्जदार पत्नी असता पतीने अर्ज भरणे, आधार क्रमांक नसणे, भ्रमणध्वनी क्रमांक न देणे, कर्जाची रक्कम चुकणे, त्याचबरोबर २०१७ पर्यंतच्या कर्जाचा उल्लेख करणे अशा प्रकारच्या चुका असल्याने जिल्हा बॅँकेने सदरची यादी बॅँकेच्या प्रत्येक शाखेत पाठवून त्या त्या शेतकºयांनी त्याची पूर्तता करण्याचे आवाहन केले. परंतु बॅँकेच्या या आवाहनाला फक्त तीन हजार शेतकºयांना प्रतिसाद मिळाला. याचाच अर्थ शेतकºयांनी चुकीचे अर्ज भरले असून खरी माहिती दडविली असावी असे बॅँक व्यवस्थापनाला वाटू लागले आहे. त्यामुळे जवळपास ४७ हजार शेतकरी या कर्जमाफी योजनेपासून आता वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.