शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:55 IST

: शहर परिसरासह जिल्ह्याला रविवारी सायंकाळी परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले. जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटात तासभर मुसळधार पाऊस सुरू होता. यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. दिवाळी खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.

नाशिक : शहर परिसरासह जिल्ह्याला रविवारी सायंकाळी परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले. जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटात तासभर मुसळधार पाऊस सुरू होता. यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. दिवाळी खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. बाजारपेठेत तीन तास वीजपुरवठा खंडित झाल्याने व्यापारी वर्गाने तीव्र संताप व्यक्त केला. परिसरात सुमारे ७.६ मि.मी. इतकी पावसाची नोंद झाली.  रविवारी सकाळपासूनच उकाड्यात वाढ झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे पावसाची शक्यता होती. सकाळपासून कडक ऊन जाणवत असताना दुपारनंतर आभाळ दाटून आले. सायंकाळी शहरातील काही भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. शहरात सायंकाळी ५ वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. रविवार असल्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहक आणि व्यापाºयांचीही धावपळ झाली. मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोडवर प्रचंड गर्दी असताना पाऊस आणि खंडित वीजपुरवठ्यामुळे बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला. रात्री उशिरापर्यंत पावसाची हजेरी कायम होती.  जिल्ह्यातील मालेगाव, वणी, चांदवड, देवळा, लोहोणेर, खामखेडा आदी परिसरात सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे.मेनरोडसह जुने नाशिक अंधारातपावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड आणि जुने नाशिक परिसरातील वीजपुरवठा सुमारे तीन तास खंडित झाल्याने व्यापारी वर्गाचे हाल झाले. पावसामुळे राजेबहादूर फिडरवर ११ के.व्ही. वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने मेनरोड तसेच शालिमार परिसरात अंधार पसरला होता. खंडित वीजपुरवठ्याने व्यापाºयांसह ग्राहकांचीही तारांबळ उडाली. भद्रकाली येथील ११ केव्ही वाहिनीवरदेखील बिघाड झाल्याने जुने नाशिक परिसरातील मोठा भाग अंधारात होता.

टॅग्स :RainपाऊसMarketबाजारNashikनाशिकDiwaliदिवाळी