शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

जिल्ह्यात दिवसभरात ७४१ रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 01:14 IST

जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या आता ३४ हजार ४६ इतकी झाली आहे. शुक्रवारी (दि. २८) नव्याने ९४८ रुग्ण आढळून आले. सर्वाधिक ७४२ रुग्ण नाशिक शहरात मिळून आले असून, उपचारार्थ दाखल ५ रुग्ण दगावले. मागील दोन दिवसांच्या तुलनेत शुक्र वारी मृतांचा आकडा कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात दिवसभरात ७४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

ठळक मुद्दे५ बळी : ९४८ नवे रु ग्ण; बाधितांची संख्या ३४ हजार पार

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या आता ३४ हजार ४६ इतकी झाली आहे. शुक्रवारी (दि. २८) नव्याने ९४८ रुग्ण आढळून आले. सर्वाधिक ७४२ रुग्ण नाशिक शहरात मिळून आले असून, उपचारार्थ दाखल ५ रुग्ण दगावले. मागील दोन दिवसांच्या तुलनेत शुक्र वारी मृतांचा आकडा कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात दिवसभरात ७४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली.मागील चार दिवसांपूर्वी कोरोनाबधित रुग्णांचा आकडा घसरला होता; मात्र मंगळवारनंतर अचानकपणे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गुरुवारी कोरोनाबाधित रुग्णांचा जिल्ह्याचा आकडा थेट १ हजारांच्यापुढे सरकला होता. तसेच शुक्र वारीसुद्धा ९४८ रु ग्ण मिळून आले. दिवसभरात जिल्ह्यात १ हजार २५२ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक ९४७ रुग्ण शहरातील आहेत. एकूणच शहरवासीयांकरिता कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे.सिन्नर तालुक्यात १२२९ बाधितसिन्नर तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता कायम आहे. तालुक्यातील कोरोनाबळींची संख्या ३१ झाली आहे. शुक्रवारी रुग्णसंख्येत २४ रुग्णांची भर पडली. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२२९ झाली असून, ९२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर २८१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.येवल्यातील ८ जण कोरोनामुक्तच्येवला शहरासह तालुक्यातील ९ संशयितांचे कोरोना अहवाल शुक्र वारी, (दि. २८) पॉझिटिव्ह आले आहेत, तर ८ बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. बाधितांमध्ये तालुक्यातील अंदरसूल, एरंडगाव, बाळापूर, येवला शहर येथील रुग्णांचा समावेश आहे. यात सात अहवाल खाजगी लॅबकडील असून, २ अहवाल रॅपिड अँटिजेन टेस्टचे आहेत.च्नाशिक ग्रामीणच्या तुलनेत शहरात स्थिती काहीशी चिंताजनक होत चालली आहे. जिल्ह्यातील वाढत्या रु ग्णसंख्येसोबत दगावणाऱ्या रुग्णांचे प्रमाण शुक्र वारी कमी झाल्याने तितकाच दिलासा मिळाला. गुरु वारी सर्वाधिक २१ रु ग्ण मृत्युमुखी पडले होते. जिल्ह्यात आतापर्यंत २७ हजार ३३७ रु ग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे.तसेच ५ हजार ८७० रु ग्ण उपचार घेत आहेत. ८८ हजार ५९५ सशयितांचे नमुना चाचणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.मालेगावी ३५ नवे रुग्णमालेगाव शहर परिसरात कोरोनाचे ३५ नवे बाधित आढळले असून, त्यात संगमेश्वरसह तालुक्यातील येसगाव, देवघट, दाभाडी आणि टेहरे येथील बाधितांचा समावेश आहे. १६६ जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यात १३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह मिळाले. बाधितांमध्ये दाभाडी, सोयगाव, मालेगाव कॅम्प, संगमेश्वर, टेहरे येथील बाधितांचा समावेश आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या