शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या ७५ टक्के विद्यार्थ्यांना गणवेषाचे वाटप

By श्याम बागुल | Updated: August 2, 2019 18:52 IST

अनुदानीत शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेष पुरविण्याबाबत शिक्षण विभाग दरवर्षी नवनवीन प्रयोग राबवित असल्यामुळे विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळा सुरू होताच कधीच गणवेष मिळालेले नाहीत. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यावर गणवेषाचे पैसे वर्ग करून त्यांनीच ते खरेदी करावे असा निर्णय घेतल्यामुळे त्यावरून बराच वाद झाला.

ठळक मुद्देशासनामुळे विलंब : १५ आॅगष्टपुर्वी प्रक्रिया करणार पुर्णबॅँकांनीही नकार दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे पैसे वेळेत जमा होवू शकले नाहीत.

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होण्यास अवघा दहा दिवसांचा कालावधी शिल्लक असताना शालेय विद्यार्थ्यांना गणवेष देण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात येवून जूनच्या अखेरच्या सप्ताहात गणवेषासाठी निधी वर्ग करण्यात आल्याने गेल्या महिना भरात नाशिक जिल्हा परिषदेच्या ७५ टक्के विद्यार्थ्यांना गणवेष मिळू शकले असून, उर्वरित २५ टक्के विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनापुर्वी गणवेष वाटप करावेत असे आदेश शिक्षण विभागाने सर्व शाळांच्या मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीला बजावले आहेत.

अनुदानीत शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेष पुरविण्याबाबत शिक्षण विभाग दरवर्षी नवनवीन प्रयोग राबवित असल्यामुळे विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळा सुरू होताच कधीच गणवेष मिळालेले नाहीत. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यावर गणवेषाचे पैसे वर्ग करून त्यांनीच ते खरेदी करावे असा निर्णय घेतल्यामुळे त्यावरून बराच वाद झाला. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना शून्य रकमेवर बॅँकेत खाते उघडावे लागले. मात्र असे खाते उघडण्यास बॅँकांनीही नकार दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे पैसे वेळेत जमा होवू शाकले नाहीत. त्याच बरोबर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी गणवेष न घेता पैसे खर्च करून टाकले तर काही बॅँकांनी गणवेषाच्या जमा झालेल्या पैशातून बॅँकेचे शुल्क परस्पर वळते करून घेतल्याने शिक्षण विभागाला वर्षभर हा विषय पुरला. त्यामुळे यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात शासनाने आपलाच निर्णय फिरवून प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेषापोटी सहाशे रूपये देण्याचा निर्णय घेवून शाळा व्यवस्थापन समितीने शालेय पातळीवर गणवेषाची खरेदी करण्याच्या सुचना केल्या. शिक्षण विभागानेच या संदर्भातील निर्णय उशिरा घेतल्याने पुढे त्याच्या अंमलबजावणीत आपसूकच उशिर झाला.नाशिक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दोन लाख, ३९ हजार विद्यार्थी असून, या सर्व विद्यार्थ्यांचे पैसे शाळा पातळीवर वर्ग करून गणवेष खरेदीसाठी दरपत्रके, कपड्यांचे मापे घेण्यासाठी विलंब लागल्याने जुलै अखेरपर्यंत एक लाख, ६७ लाख, ६५४ विद्यार्थ्यांना गणवेष वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित जवळपास २५ टक्के विद्यार्थ्यांना १५ आॅगष्टपुर्वी शाळांनी गणवेष खरेदी करून घेवून द्यावेत असे आदेश प्रशासनाने सर्व शाळा व व्यवस्थापन समितीला दिले आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदEducationशिक्षण