शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्यावारसदारांना शिलाई मशिनचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 00:39 IST

येवला : येथील माणुसकी फाऊंडेशनच्या वतीने तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या चार वारसदारांना शिलाई मशीनचे वाटप पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देमाणुसकी फाऊंडेशनचा उपक्रम : लाभार्थी कुटूंबाचे सर्वेक्षण

येवला : येथील माणुसकी फाऊंडेशनच्या वतीने तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या चार वारसदारांना शिलाई मशीनचे वाटप पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते वाटप करण्यात आले.आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपत असली तरी सामाजिक जबाबदारीपुर्ण होत नाही. याच सामाजिक जबाबदारी व उत्तरदायित्वाच्या भावनेतून तालुक्यातील जानेवारी २०१५ पासूनचे शेतकरी आत्महत्या पात्र लाभार्थी कुटूंबाचे विविध मुद्यावर आधारित सर्वेक्षण करण्यात आले. सदर आत्महत्याग्रस्त कुटुंबाना भेट देऊन त्यांची सद्यस्थिती जाणून घेवून त्यांना शासनाच्या कोणत्या योजनांचा लाभ देता येईल हे निश्चित करून त्यानुसार त्यांना लाभ देण्यासाठी उभारी कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे तहसिलदार प्रमोद हिले यांनी सांगितले.उभारी कार्यक्रमांतर्गत शेतकरी कुटुंबाना भेट देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यांना शासनांच्या विविध योजनांचा लाभ मिळाला अथवा नाही हे जाणून घेणे, लाभ मिळाला नसल्यास त्यांना तो मिळवुन देणे त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी अंगीकारून नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी याबाबत पालकत्व स्वीकारणे असा या योजनेचा उद्देश आहे.महसूल विभागा अंतर्गत आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या नावे असलेली जमिन, प्लॉट, घर व इतर स्थावर मालमत्ता संबधित शेतक-यांच्या वारसांच्या नावे हस्तांतरित करण्यासाठी विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून कार्यवाही पुर्ण करण्यात आलेली आहे.रेशनकार्ड व अन्नधान्याचा लाभ सुरू करण्यात आलेला आहे व सामाजिक अर्थसहाय्ययोजनेचा लाभ देणेत आलेला आहे. तसेच कृषी, पंचायत समिती व इतर विभागाचे लाभ देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने येवला तालुक्यात १ जानेवारी २०१५ पासूनचे शेतकरी आत्महत्या वारसदारांची यादी तयार करून विविध योजनेचे लाभ देण्यात येत असल्याचे तहसिलदार हिले यांनी सांगितले.या कार्यक्रम प्रसंगी प्रांताधिकारी सोपान कासार, पंचायत समिती गटविकास अधिकारी उमेश देशमुख, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, मोहन शेलार, अरूण थोरात, बाळासाहेब लोखंडे, बाबुलाल कासलीवाल, अल्केश कासलीवाल आदी उपस्थित होते. 

टॅग्स :GovernmentसरकारSocialसामाजिक