शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन गौरव पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 00:05 IST

येवला : येथील संत नामदेव शिंपी समाज युवा सेवा समितीच्यावतीने जिल्हास्तरीय संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन गौरव पुरस्कारांचा वितरण सोहळा संपन्न झाला.

ठळक मुद्देप्रभाकर झळके यांना तर धार्मिकरत्न पुरस्कार

येवला : येथील संत नामदेव शिंपी समाज युवा सेवा समितीच्यावतीने जिल्हास्तरीय संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन गौरव पुरस्कारांचा वितरण सोहळा संपन्न झाला.सदर पुरस्कार वितरण सोहळा श्री संत नामदेव विठ्ठल मंदिर सभागृहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी सोमनाथ हाबडे होते. विशेष निमंत्रित म्हणून साहित्यिक नंदन रहाणे उपस्थित होते. उद्घाटन गुरुद्वारा प्रबंधन कमिटीचे प्रधान बलरामसिंग संधु यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून नगगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, भोलानाथ लोणारी, किशोर सोनवणे, धनंजय कुलकर्णी, सुहास भांबारे, जयवंत खांबेकर, संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.यावेळी उत्कृष्ट स्वयंसेवी संस्था पुरस्कार धडपड मंच अध्यक्ष प्रभाकर झळके यांना तर धार्मिकरत्न पुरस्कार निवृत्ती चव्हाण, दत्तात्रय जाधव यांना प्रदान करण्यात आला. सामाजिकरत्न पुरस्कार सतीश भांबारे, श्याम सारंगधर, अरविंद टापसे, महेश काबरा यांना तर शैक्षणिकरत्न पुरस्कार कुणाल दराडे, प्रवीण बनकर यांना प्रदान करण्यात आला. कलारत्न पुरस्कार चेतन बेदडे, श्रीकांत खंदारे, व्यसनमुक्तीरत्न संजयबापू कुलकर्णी, समाज प्रबोधनरत्न पुरस्कार अजय सोनवणे, संतोष विंचू, चेतन कोळस, आरोग्यरत्न पुरस्कार किरण वाटारे, उद्योगरत्न पुरस्कार विकास काकडे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.समितीचे संस्थापक अध्यक्ष मुकेश लचके यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन पुरुषोत्तम रहाणे यांनी तर आभार राजेंद्र गणोरे यांनी मानले. कार्यक्रमास राम तुपसाखरे, राजेंद्र कल्याणकर, पुरुषोत्तम रहाणे, पांडुरंग खंदारे, राजेंद्र गणोरे, कवित माळवे, अमोल लचके, तुषार भांबारे, संदीप लचके, बळीराम शिंदे, रमाकांत खंदारे, मधुसुदन शिंदे, अक्षय निरगुडे, सोमनाथ शिंदे, आबा सुकासे, वरद लचके, सुनिल टिभे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :yevla-acयेवलाSocialसामाजिक