सुरगाणा : तालुक्यातील हेमाडपाडा, सादुडणे, मुरूमदरी, वडपाडा व रानपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. साथीच्या आजारापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी घेऊन काळजी घेतली पाहिजे. बाहेरून आल्यानंतर सॅनिटायझरने हात स्वच्छ साफ करणे गरजेचे आहे. तसेच विनाकारण गावात फिरणे, गावाच्या बाहेर जाणे टाळावे असे आवाहन ग्रामसेवक राजेंद्र खांडवी यांनी केले. नवसंकल्प एकता परिषद महाराष्ट्रचे राज्याध्यक्ष दीपक भोये यांनीही अनोळखी व्यक्ती गावात विनाकारण आल्यास पोलीसपाटलास कळविणे, अशी सूचना केली आहे. यावेळी मनखेड सोसायटीचे चेअरमन धनराज गावित, सरपंच पुष्पा महाले, ग्रामपंचायत सदस्य हौसाबाई गावित, गुलाब जाधव, किरण पिठे, दीपक गावित आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
हेमाडपाडा येथे सॅनिटायझरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 00:05 IST