शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७ कोटी रुपयांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 00:03 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यावर कधी करपा रोगाने तर कधी अवकाळी पावसाने हैराण करून सोडले होते. आलेल्या अस्मानी संकटांना तोंड देत शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावरून नेला, काहींचा मातीमोल झाला. अशा परिस्थितीत विविध संकटांचा सामना करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या करिता सर्व स्तरातून मागणी होत होती.

ठळक मुद्देइगतपुरी : तालुक्यातील प्रशाकीय स्तरावरून १६ कोटींची मागणी

घोटी : इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यावर कधी करपा रोगाने तर कधी अवकाळी पावसाने हैराण करून सोडले होते. आलेल्या अस्मानी संकटांना तोंड देत शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावरून नेला, काहींचा मातीमोल झाला. अशा परिस्थितीत विविध संकटांचा सामना करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या करिता सर्व स्तरातून मागणी होत होती.प्रशासकीय यंत्रणेकडून काही शेतकऱ्यांना टप्या टप्याने नुकसान भरपाई वितरित होत असल्याने आणि उर्वरित शेतकऱ्यांना भरपाई मिळणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसाने व विविध संकटानी १२६ गावांना नुकसानाचा सामना करावा लागला आहे. तालुक्यातील नुकसानग्रस्त क्षेत्र हे १६२०८ हेक्टर असे आहे. सदर नुकसानीचे पंचनामे करून तीन महसूली कार्यालया मार्फत १६ कोटी २० लाख ८१ हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी प्रशासकीय पातळीवर करण्यात आली होती. त्यापैकी ७ कोटी च्या वर रक्कम तहसीलदार कार्यालयामार्फत वाटप करण्यात आले आहे. उर्वरित रक्कम त्वरित देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.याआधीचे एक पीक हातातुन गेले असल्याने पुढील पिकासाठी मशागतीसाठी पैसा नसल्याने शेतकरी राजा हवालदील झाला आहे. बळीराजाला नवसंजीवनी देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. शेतीच्या मशागतीला लागणारा खर्च आणावा कुठून असे संकट शेतकऱ्यासमोर समोर उभे ठाकले आहे, त्यामुळे लवकरात लवकर उर्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे.इगतपुरी तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना त्यांची भरपाई देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रशासकीय पातळीवर नुकसान भरपाईची मागणी होत असून उर्वरीत नुकसानग्रस्थाना लवकरच भरपाई मिळणार आहे.कार्यालयाने काटेकोरपणे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची यादी शासनाकडे सादर केली असून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे ३ महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन केले आहे. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्या संयुक्त भेटीद्वारे शेतकऱ्यांच्या समक्ष नुकसानीचे पंचनामे केले आहेत. लवकरच भरपाई संपूर्ण शेतकऱ्यांना मिळेल याकरिता प्रयत्नशील आहोत.- शितलकुमार तवर, तालुका कृषी अधिकारी, इगतपुरी.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती