सटाणा : इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिड टाऊनच्या वतीने समाजात प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यासाठी इनरव्हील क्लबच्यावतीने पक्षांची घरटी व कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या.५०० कापडी पिशव्या तसेच विविध स्पर्धेत विजेत्या झालेल्याना स्मृतीचिन्ह आणि पक्ष्यांसाठी उपयुक्त असणारे ५० घरटे वाटप केले. कार्यक्र मासाठी सटाणा इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष रु पाली जाधव आणि सचिव साधना पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान रांगोळी स्पर्धेतील विजेत्या आशा येवला यांना स्कृतीचिन्ह, घरटे व कापडी पिशवी देण्यात आली. श्लोक स्पर्धा विजेत्यांनाही बक्षीस देण्यात आले .प्लॅस्टिकच्या वापराने आपण मानवांनी निसर्गात हस्तक्षेप केला आज कोरोना महामारीमुळे निसर्गाने मानवास प्लास्टिक मध्ये गुंडाळले. आता तरी थोडं सुधारावे म्हणुन इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिड टाऊन आणि एंजल्स क्लबच्या वतीने निसर्गाच्या जतनासाठी हा उपक्र म राबवण्यात आला.(०८ सटाणा)
सटाणा इनरव्हील क्लबच्या वतीने पक्षांची घरटी, कापडी पिशव्या वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 16:11 IST
सटाणा : इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिड टाऊनच्या वतीने समाजात प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यासाठी इनरव्हील क्लबच्यावतीने पक्षांची घरटी व कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या.
सटाणा इनरव्हील क्लबच्या वतीने पक्षांची घरटी, कापडी पिशव्या वाटप
ठळक मुद्दे५०० कापडी पिशव्या तसेच ५० घरटे वाटप केले.