लोहोणेर : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शिल्लक पोषण आहाराचे वाटप इयता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी पालक उपस्थित होते. सध्या कोरोना या विषाणूमुळे संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले. त्या अनुषंगाने जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये म्हणून या योजनेंतर्गत शाळेत शिल्लक असलेल्या धान्याचे वाटप करण्यात आले. यात तांदूळ, मठ, मूग, हरभरा आणि तूरडाळ आदींचा समावेश होता. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोविंद बागुल, सदस्य किशोर आहेर, किशोर देशमुख, हेमंत जगताप, वृषाली केल्हे, मुख्याध्यापक आर. एच. भदाणे आदी उपस्थित होते.
लोहोणेर विद्यालयात पोषण आहाराचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 15:53 IST