नाशिक : कोजागरीनिमित्त शहरातील युवक मित्रमंडळाच्या वतीने कालिका माता मंदिर परिसरात कोजागरी पौणिमेनिमित्त गोड दुधाचे वाटप करण्यात आले.युवक मित्रमंडळाच्या वतीने कोजागरी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी भाविकांना दूध वाटप करण्यात येते. गेल्या १२ वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.युवक मित्रमंडळाच्या वतीने कालिका माता मंदिर परिसरात कोजागरीनिमित्त रोहन झुटे, हर्षद फुलसुंदर यांच्या सहकार्याने २०१ लिटर दुधाचे मोफत वाटप भाविकांना करण्यात आले. यावेळी विश्वा वाघमारे, अवि विधाते, चेतन गिरे, अक्षय झुटे, चेतन काळे सुमीत विधाते, अमोल गायकवाड, आकाश गिते आदी उपस्थित होते.
कोजागरीनिमित्त दूध वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:55 IST