शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक विभागात बारावीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून गुणपत्रिकांचे वाटप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 19:54 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरुवारी (दि.१६) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असला तरी विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत अद्याप गुणपत्रिकी प्राप्त झालेल्या नाही. विद्यार्थ्यांना या गुणपत्रिकांचे वाटप शुक्रवारी (दि. ३१) दुपारी तीन वाजेपासून करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबारावीच्या गुणपत्रिकांची प्रतिक्षा संपलीविद्यार्थांना शुक्रवारी होणार गुणपत्रिकांचे वाटप

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरुवारी (दि.१६) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असला तरी विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत अद्याप गुणपत्रिकी प्राप्त झालेल्या नाही. विद्यार्थ्यांना या गुणपत्रिकांचे वाटप शुक्रवारी (दि. ३१) दुपारी तीन वाजेपासून करण्यात येणार आहे. त्यापूर्वी गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत महाविद्यालयांना गुणपत्रिका वितरीत करण्यात येणार असून, त्यासाठी विभागीय शिक्षणमंडळाने ११ वाटप केंद्र निश्चित केले आहेत.बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी मूळ गुणपत्रिकांची प्रतीक्षा लागली होती. या गुणपत्रिका शनिवारीच (दि.२५) विभागीय मंडळाला प्राप्त झाल्या होत्या. त्यांचे माहाविद्यालयनिहाय वर्गीकरण व पडताळणी करून विद्यार्थ्यांना ३१ जुलै रोजीपासून गुणपत्रिका वितरत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी ३० जुलै रोजी तालुकानिहाय गुणपत्रिकांचे वितरण केले जाईल. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयातर्फे  प्राचार्यांना पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर निकालपत्रक वितरित करताना शासकीय नियमांचे पालन करावे. गर्दी होणार नाही याबाबत काळजी घ्यावी, तसेच  विशिष्ट तारखेलाच गुणपत्रक घेऊन जावे, असा आग्रह महाविद्यालयांनी करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्याची माहिती विभागीय सचिव नितीन उपासनी यांनी दिली आहे. 

निकालपत्र वाटपाचे नियोजनबारावीचे निकालपत्र महाविद्यालयांना गुरुवारी (दि.३०) सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत शिक्षण मंडळाकडून वितरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी विभागीय मंडळाने तालुकानिहाय नियोजन केले असून, दिंडोरी, सिन्नर, नाशिक ग्रामीण व नाशिक शहर, कळवण, इगतपुरी, निफाड, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यांचे निकाल नाशिक विभागीय मंडळातच मिळणार आहेत, तर चांदवड, देवळा, मालेगाव ग्रामीण, सटाणा व मालेगाव  शहरातील निकालपत्रक मविप्रच्या कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, स्वप्नपूर्तीनगर, भोकरमळा, सोयगाव, मालेगाव येथे मिळतील. नांदगाव व येवलाचे निकाल संत बार्णबा हायस्कूल मनमाड येथे वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक विभागीय शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकHSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थी